जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण चिंताजनक, कुपोषणाचे प्रमाणही वाढले; कुपोषित बालकांची संख्या १४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:01+5:302021-07-14T04:36:01+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराची कुठलीही साधने नसल्याने दरवर्षी परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची संख्याही वाढतच आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या ...

Migration for employment in the district is alarming, malnutrition is also on the rise; The number of malnourished children is 14 percent | जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण चिंताजनक, कुपोषणाचे प्रमाणही वाढले; कुपोषित बालकांची संख्या १४ टक्क्यांवर

जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण चिंताजनक, कुपोषणाचे प्रमाणही वाढले; कुपोषित बालकांची संख्या १४ टक्क्यांवर

Next

नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराची कुठलीही साधने नसल्याने दरवर्षी परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची संख्याही वाढतच आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या पूर्वी ही स्थलांतरित कुटुंबे परत येतात असा समज आहे. पण यंदा लॉकडाऊन असतानाही जूनमध्ये करण्यात आलेल्या कुपोषित बालकांच्या स्किनिंग सर्वेक्षणात तब्बल १३ टक्क्यांहून अधिक बालके स्थलांतरित झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात मजुरांच्या स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी दिवाळीनंतर रोजगारासाठी सुमारे एक लाखाहून अधिक कुटुंबे स्थलांतरित होतात. परंतु याबाबतची अधिकृत नोंद शासन स्तरावर राहत नाही. यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनातही साधारणत: अडीच दशकांपूर्वी प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री गो. शि. चौधरी यांनी असे कुठलेही स्थलांतर होत असल्याची नोंद शासन दरबारी नसल्याचे म्हटले होते. अर्थातच स्थलांतराचे सर्वेक्षण होत नाही. त्यामुळे प्रशासनाकडेही त्याची अधिकृत नोंद राहत नाही. नोंदच नसल्याने उपाययोजनाही होत नाहीत, असे आजवरचे चित्र आहे.

यावर्षी लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी परत आलेले मजूर जाणार नाहीत असा समज होता. पण प्रत्यक्षात मात्र हा समज खोटा ठरला आहे. कारण अनेक मजूर पुन्हा रोजगारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. सध्या कुपोषित बालकांचे स्किनिंग सर्वेक्षण सुरू आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक बालकापर्यंत टीम पोहोचत आहे. १ जून ते १० जुलै २०२१ दरम्यान धडगाव, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा या चार तालुक्यांतील स्किनिंग झाले आहेत. या तालुक्यात एकूण एक लाख आठ हजार ७५० शून्य ते सहा वर्षांची मुले आहेत. परंतु त्यापैकी केवळ ९४ हजार ९२ मुले स्किनिंग पथकाला स्किनिंग करता आली. १४ हजार ५२४ मुले पालकांसोबत स्थलांतरित झाल्याने त्यांचे स्किनिंग करता आले नाही. अर्थातच या सर्वेक्षणातून कुपोषित बालकांची माहिती तर मिळालीच पण त्यासोबत अनेक कुटुंबे स्थलांतरित झाल्याचेही समोर आले आहे. वास्तविक जून महिन्यात अर्थात पावसाळ्यापूर्वी सर्व स्थलांतरित कुटुंबे आपल्या गावी परततात. पण यंदा जवळपास या चार तालुक्यातील १० हजार कुटुंबे स्थलांतरितच असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळातील ही स्थिती निश्चितच चिंताजनक आहे.

जिल्ह्यातील कुपोषण व स्थलांतराची स्थिती अशी

तालुका एकूण बालके अतितीव्र कुपोषितकुपोषितस्थलांतर

अक्कलकुवा ३६,६६२ ७५९ ३,७८४४,७९९

धडगाव ३१,५१४ ७१८ ३,१३४५,४९४

तळोदा १२,१७८ ३०७ १,५८८१,४५०

शहादा २८,६९६ ४५८ २,६६१२,७८१

एकूण १,०८,७५० २,२४२ ११,१६७१४,५२४

Web Title: Migration for employment in the district is alarming, malnutrition is also on the rise; The number of malnourished children is 14 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.