प्रकाशा परिसरात कापसावर मिलीबग रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:43 PM2018-08-11T12:43:28+5:302018-08-11T12:43:38+5:30

Milbig disease attack on cotton in the area | प्रकाशा परिसरात कापसावर मिलीबग रोगाचे आक्रमण

प्रकाशा परिसरात कापसावर मिलीबग रोगाचे आक्रमण

Next

प्रकाशा : परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतक:यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने आक्रमण केल्याने पीक  वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
परिसरात यंदा सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू पिकांची अवस्था फारच खराब आहे. जेमतेम झालेल्या पावसावर शेतक:यांनी पेरणी व कापसाची लागवड केली आहे.  मात्र जोरदार पाऊस नसल्याने जमिनीतील ओल कमी आहे. 
सद्यस्थितीत खरीप हंगामातील सर्वच पिकांना पावसाची नितांत गरज आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने  आक्रमण केल्याने हे पीक  वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. राजेश्वर पाटील, सुदाम पाटील, शरद पाटील आदी शेतक:यांच्या शेतात बोंडअळी तर जितेंद्र चौधरी, राजेंद्र चौधरी यांच्या कापूस पिकावर मिलीबग रोग आढळून येत आहे. त्यामुळे शेतक:यांची चिंता अधिकच वाढली असून जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वाना लागून  आहे.
 

Web Title: Milbig disease attack on cotton in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.