शहादामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, अचानक मोठा आवाज आल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 02:20 PM2021-01-02T14:20:52+5:302021-01-02T14:24:10+5:30

सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्टर स्केलचा धक्का आहे. 

Mild tremors in Shahada nandurbar | शहादामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, अचानक मोठा आवाज आल्याने भीतीचे वातावरण

शहादामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, अचानक मोठा आवाज आल्याने भीतीचे वातावरण

Next

शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आज दुपारी एक वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले शहरातील सोनार गल्ली भागात अचानक मोठा आवाज झाल्याने व्यावसायिकांसह परिसरातील नागरिक घरातून बाहेर रस्त्यावर आले होते. तालुक्यातील सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्टर स्केलचा धक्का आहे. 

शहरापासून सुमारे शंभर ते सव्वाशे किलोमीटर दूर असलेल्या मध्यप्रदेशातील गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती सावळदा येथील भूकंपमापन केंद्राने दिले आहे. या धक्क्यामुळे कुठे नुकसान झाले नसले तरी दिवसभर प्रशासनाला ग्रामीण भागातील नागरिकांचे फोन येत असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.


 

Web Title: Mild tremors in Shahada nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप