सव्वाचार लाखांचा गांजा दरानजीक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:41 PM2020-12-24T12:41:07+5:302020-12-24T12:42:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मध्यप्रदेशातून धडगावकडे जाणारा चार लाख २७ हजारांचा गांजासह वाहन असा एकुण नऊ लाख २७ ...

Millions of cannabis seized | सव्वाचार लाखांचा गांजा दरानजीक जप्त

सव्वाचार लाखांचा गांजा दरानजीक जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  मध्यप्रदेशातून धडगावकडे जाणारा चार लाख २७ हजारांचा गांजासह वाहन असा एकुण नऊ लाख २७ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला. दराफाटा, ता.शहादा येथे २२ रोजी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 
पोप्या डेमच्या पावरा, रा.धडगाव पिंप्री, ता.धडगाव व विनोद भगवान चव्हाण, रा.वडफळ्या, ता.धडगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, मध्यप्रदेशातून गांजा धडगावकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने दरा फाट्याजवळ पाळत ठेवली.  रात्री उशीरा महिंद्रा मॅक्स वाहन (क्रमांक एमएच ३९-०९१३) आले असता त्याला थांबवून झडती घेतली. वाहनात तब्बल चार लाख २७ हजार ९४५ रुपये किंमतीचा सुका गांजा आढळला. 
पथकाने गांजासह वाहन असे एकुण नऊ लाख २७ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोप्या पावरा व विनोद चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एम.रमेश करीत आहे. 

Web Title: Millions of cannabis seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.