कबूतर विक्रीतून होते लाखोंची उलाढाल
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: September 6, 2018 11:55 AM2018-09-06T11:55:28+5:302018-09-06T11:55:42+5:30
‘वाईल्ड लाईफ’ येतेय धोक्यात : सूरतेत कबुतर विक्रीसाठी मोठी बाजारपेठ
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नैसर्गिक जीवन साखळीचे महत्वाचे आधार असलेल्या पशु-पक्षांच्या तस्करीचे नवे प्रकरण उजेडास आले आह़े सोमवारी मोठय़ा संख्येने अवैधरित्या कबुतरे घेऊन जाणा:या 5 संशयित आरोपींना नंदुरबार लोहमार्ग पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होत़े याबाबत अधिक चौकशी केली असता़ कबुतरांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे स्पष्ट झाले आह़े
दरम्यान, कबुतरांसोबत अजून काही प्राण्यांची अशा प्रकारे तस्करी किंवा वाहतूक केली जातेय की काय? या दिशेनही वनविभागाकडून आता तपास केला जात आह़े कोलंबिया लिवीया जातीचे कबुतर हे शेडय़ुल्ड चारमध्ये मोडले जात आहेत़ त्यामुळे ही प्रजात संरक्षित नसली तरीदेखील तिला पाळणे किंवा नैसर्गिक अधिवारापासून दूर ठेवणे ‘वॉईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट’नुसार गुन्ह्यास पात्र असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात ‘लव्ह बर्ड’ तसेच पक्षी खरेदी-विक्रीसाठी बाजारपेठ नाही़ परंतु सूरतमध्ये याची मोठी बाजापेठ आह़े त्यामुळे साहजिकच देशभरातून कबुतरांची तस्करी करुन ती सूरतेत विक्री करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ त्याच प्रमाणे कबुतरांचा वापर रेस्ट्रॉरंटमध्ये तसेच फार्म हाऊसमध्ये करण्यात येत असतो़ परंतु वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत ‘वाईल्ड प्रॉटेक्ट’ प्राण्यांना पाळणे गुन्ह्यास पात्र ठरु शकत़े त्याच प्रमाणे संशयितांकडून ज्या पध्दतीने कबुतरांची हाताळणी करण्यात आली, तोदेखील निर्दयीपणा असल्याचे सांगण्यात येत आह़े कबुतरांच्या तस्करीच्या कारणांबाबत सर्व शक्यता पडताळल्या असता, यास अंधश्रध्देची किनार असल्याचे दिसून येत आह़े कबुतराच्या तेलामुळे सांधे दुखीचे आजार बरे होतात, लिव्हरसंबंधि आजार बरा करण्यासाठी कबुतराचे लिव्हर खांल्यास फायदा होतो, त्याच प्रमाणे अघोरी विद्येचा वापर करण्यासाठीही कबुतराचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़ सूरतेत कबुतरांची मोठी बाजारपेठ असल्याने संपूर्ण देशात कबुतरांची तस्करी करणारी टोळीच सक्रीय असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, सोमवारी ताप्तीगंगा एक्सप्रेसमधून लखनौ येथून सुरतेला कबुतरांची वाहतूक करणा:या संशयित आरोपी मोहम्मद फजल अन्सारी (60), मोहम्मद इरफान (45), मोहम्मद सईद कुरेशी (40), मोहम्मद रफीक अहमद मन्सूरी (35), फरकान शेख (25) यांना बुधवारी नंदुरबार येथील न्यायदंडाधिकारी श्रेणी 1 यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होत़े या वेळी आरोपींचे म्हणणे एकत न्यायालयाने त्यांना 14 सप्टेंबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावली आह़े दरम्यान, संबंधित कबुतरांबाबत मात्र न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही़ कबुतरांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे अशी मागणी वनविभागाकडून करण्यात आली होती़ परंतु वनविभागाचे म्हणणे न्यायालयाकडून फेटाळण्यात आले होत़े त्यामुळे न्यायालयाच्या पुढील निर्णयार्पयत वनविभागाला संबंधित कबुतरांची सोय करावी लागणार आह़े
न्यायालयाने संशयित आरोपींचे म्हणणे जाणून घेतले असता, कबुतर पाळण्यासाठी घेऊन जात असल्याची ‘री’ बुधवारीही ओढण्यात आली़ परंतु वाईल्ड अॅक्टनुसार पक्षी पाळणेही कायद्यात बसत नसल्याचे जाणकारांनी सांगितल़े