चांदसैलीमार्गे वर्षभर मिनीबस सेवा बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:41 PM2020-01-11T12:41:23+5:302020-01-11T12:45:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहा महिन्यांपासून बंद असलेली तळोदा ते धडगाव मार्गावरील नंदुरबार आगाराची बससेवा वर्षभर बंदच राहण्याची ...

Minibus service will be closed throughout the year via moonshine | चांदसैलीमार्गे वर्षभर मिनीबस सेवा बंद राहणार

चांदसैलीमार्गे वर्षभर मिनीबस सेवा बंद राहणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सहा महिन्यांपासून बंद असलेली तळोदा ते धडगाव मार्गावरील नंदुरबार आगाराची बससेवा वर्षभर बंदच राहण्याची शक्यता आहे. रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागामार्फत देण्यात आलेला प्रस्ताव शासनाकडून मंजूर करण्यात आला नसल्याने या समस्येत पुन्हा अधिक वाढ होत आहे.
जिल्ह्यात धडगाव ते तळोदा हा रस्ता चांदसैली घाटामुळे सर्वाधिक अवघड ठरतो. त्यामुळे या मार्गावरुन केवळ लहान वाहतुकच सुरू करण्यात आली होती. ही त्यात मिनीबस सेवेला हा रस्ता काही अंशी अनुकुल ठरत असल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बस देखील सुरू करण्यात आली. या बससेवेमुळे दुर्गम भागातील सर्व प्रवाशांना हा मार्ग सोयीचा ठरत होता. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी तेथील नागरिकांना हाच मार्ग परवडत असल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील मोठी होती.
या प्रवास सेवेतून नंदुरबार आगाराला मोठे उत्पन्न देखील मिळत होते. परंतु जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदसैली या मार्गावर ठिकठिकाणी रस्ता तुटला शिवाय वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरुन होणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे या मार्गावरुन होणारी वाहतुक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविगाभामार्फत नंदुरबार नंदुरबार परिवहन आगाराला बससेवा बंद करण्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार सेवा करण्यात आली.
हा रस्ता लवकरच दुरुस्त होऊन बससेवाही सुरू होईल अशी अपेक्षा दुर्गम भागातील प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती. परंतु सहा महिन्यांनंतरही रस्तादुरुस्त झाला नसल्यामुळे बससेवाही सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे या बंद सेवेचा फटका दुर्गम भागातील प्रवाशांना सर्वाधिक सहन करावा लागत आहे. त्याशिवाय नंदुरबार आगाराच्या चारही बसरफेºया या नियमित ये-जा करणाºया कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठरत होत्या. परंतु त्यांनाही खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. काही कर्मचाºयांना धडगावलाच स्थायिक व्हावे लागले तर बहुतांश कर्मचारी समुहाने खाजगी वाहनाने जात आहे.

Web Title: Minibus service will be closed throughout the year via moonshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.