नंदुरबारातील किमान तापमानात पुन्हा घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:40 PM2019-01-10T16:40:30+5:302019-01-10T16:40:34+5:30

ग्रामीण भागात थंडीची लाट : नंदुरबार 10.2, शहादा 6 तर नवापूर 7 अंशावर

The minimum temperature in Nandurbar decreased again | नंदुरबारातील किमान तापमानात पुन्हा घट

नंदुरबारातील किमान तापमानात पुन्हा घट

Next

नंदुरबार : बुधवारी नंदुरबारातील किमान तापमानात पुन्हा घट बघायला मिळाली़ नंदुरबारात 10.2, शहाद्यात 6 तर नवापूरात 7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आह़े मिळालेल्या माहितीनुसार तोरणमाळ येथे 1.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली  आह़े
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील किमान तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर होत़े बुधवारी यात दोन ते तीन अंशाने घट झालेली बघायला मिळाली़ तर शहाद्यातदेखील किमान तापमान 6 अंशार्पयत गेले होत़े उत्तरेकडील प्रदेशांमध्ये मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने थंडीची लाट कायम आह़े
दरम्यान, शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात गारवा निर्माण झाला आह़े उत्तरेकडून येत असलेल्या थंड वा:यांमुळे मागील तीन दिवसात सातपुडा परिसरात थंडीत वाढ झालेली दिसून येत आह़े याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आह़े दुर्गम भागात शरीर गोठवणारी थंडी निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच सकाळ व रात्री ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून येत आह़े थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळवत आह़े 
थंडीचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवत असला तरी, रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील शेतक:यांना पिकांना पाणी  देणे कठीण जात आह़े कडाक्याच्या थंडीमुळे साथरोगांची भितीदेखील वाढली आह़े त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात  रुग्णांची मोठय़ा संख्येने गर्दी होताना दिसून येत आह़े 
ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवून थंडीपासून बचाव करण्यात येत आह़े वाढत्या थंडीमुळे विद्याथ्र्याना शाळेत जाण्यास मोठय़ा प्रमाणात अडचणी येत आहेत़ अनेक विद्याथ्र्याच्या शाळा सकाळच्या सत्रात भरत आह़े त्यामुळे भर थंडीत विद्याथ्र्यांना सकाळी शाळेत जाणे जिकीरीचे ठरत आह़े ग्रामीण भागात सायंकाळी लवकर शुकशुकाट होत असतो़ त्यामुळे दुपारच्या सत्रात भरणा:या शाळादेखील लवकर सोडण्यात याव्या अशी मागणी आह़े पुढील काही दिवस थंडीत अधिक वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े 
 

Web Title: The minimum temperature in Nandurbar decreased again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.