नागरिकांनीच पकडून दिले गौण खनिजाचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:11 PM2019-12-07T12:11:22+5:302019-12-07T12:11:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गौण खनिज वाहतूक करणारे वाहन लांबोळा जवळ गावकऱ्यांनी वाहने पकडून दिली. यापैकी तीन वाहनात ...

Mining vehicles seized by the citizens | नागरिकांनीच पकडून दिले गौण खनिजाचे वाहन

नागरिकांनीच पकडून दिले गौण खनिजाचे वाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गौण खनिज वाहतूक करणारे वाहन लांबोळा जवळ गावकऱ्यांनी वाहने पकडून दिली. यापैकी तीन वाहनात गौणखनिज आढळल्याने तिघांवर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील गौणखनिजाची वाहनांमुळे होणारे अपघात, जीवित हानी लक्षात घेता आता सजग नागरिकांनीच वाळू माफियांवर वचक निर्माण करणे सुरू केले आहे. याचा प्रत्यय लांबोळे तालुका शहादा येथे आला. यात गावकऱ्यांनीच ही वाहने पकडून दिल्याने महसूल विभागाला कारवाई करणे क्रमप्राप्त ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक डंपर (क्रमांक एमएच-०४- इएल ९१२) हे विलास छगन पाटील यांच्या नावे असून यात २ ब्रास डबर आढळले. कोणतीही पावती नसल्याने महसूल विभागाने यावर दंडात्मक कारवाई करत एक लाख एक हजार ८७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. (एमएच -३९ १६९९) या डंपर मध्ये देखील डबर आढळून आल्याने विनोद विनायक पाटील यांना एक लाख चार हजार ८७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तर ओंकार श्रीराम माळी यांच्या नावे असलेल्या डंपर (एमएच २३- २३८६) यामध्ये दोन ब्रास माती आढळी यावर एक लाख एक हजार ८७५ रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाचे कर्मचारी पंकज अहिलापुरकर यांनी दिली.

Web Title: Mining vehicles seized by the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.