किरकोळ वादातून तळोद्यात एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:33 AM2019-02-13T11:33:03+5:302019-02-13T11:33:11+5:30
परस्परविरोधी फिर्याद : राजकीय पक्षाची पोस्टरद्वारे बदनामी केल्याचा संशय
नंदुरबार : तळोदा शहरात राजकीय पक्षाची बदनामी करण्याच्या संशयातून दोन गटात हाणामारी झाली़ सोमवारी दुपारी अडीच वाजता हातोेडा रोड व स्मारक चौकात ही घटना घडली़ घटनेनंतर दोन्ही गटांनी तळोदा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे़
याबाबत आकाश भानुदास राजपूत रा़ महरुण कुकरमुंडा, गुजरात याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष आनंदराव बाविस्कर किराणा दुकानातून उधारीने माल दिला नाही म्हणून धारदार कोयता व स्कू्र ड्रायव्हर या हत्याराने वार करुन आकाश राजपूत यास जखमी केले़ तसेच यादरम्यान संशयिताकडून शिवीगाळ करण्यात आली़
तर दुसऱ्या गटाकडून सुभाष उर्फ छोटू आनंदराव बाविस्कर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश राजपूत, पृथ्वी राजपूत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष कलाल नामक व्यक्ती आणि इतर दोघांनी सर्व रा़ तळोदा सोमवारी दुपारी स्मारक चौकात अडवून सुभाष बाविस्कर यास मारहाण केली़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने शिवीगाळ करण्यासह अर्वाच्च कागदपत्रांचे झेरॉक्स वाटल्याच्या संशय व्यक्त करत करत पाचही जणांनी मारहाण केली़ मारहाणीत सुभाष बाविस्कर याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली़ दोन्ही फिर्यादींचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व राठोड करत आहेत़ या प्रकारामुळे तळोदा शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत प्रकाराबाबत एकच खळबळ उडाली आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी पी़एऩमेढे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली़