मिस अॅण्ड मिसेस सारंगीची उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:12 PM2018-12-28T13:12:46+5:302018-12-28T13:12:51+5:30
चेतक फेस्टीवल : निकालाकडे लक्ष, स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
सारंगखेडा : येथील चेतक महोत्सवात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गुरुवारी ‘मिस अॅण्ड मिसेस सारंगी’ ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिला व मुलींनी सहभाग नोंदवून आपला आत्मविश्वास रॅम्पवॉकव्दारे दाखवला. ख:या अर्थाने सारंखेडा येथील चेतक महोत्सवामध्ये होणारी सौंदर्य स्पर्धा जागतिक स्तरावर होणा:या सौंदर्य स्पर्धा सारखी अनुभवायला आली.
ही स्पर्धा पाहताना अनेकांनी आपल्या टाळ्यांच्या गजरात महिला व मुलींना दाद दिली. मोठमोठय़ा शहरांमध्ये किंवा जागतिक स्तरावर या स्पर्धा होत असतात. त्याच धर्तीवर चेतक महोत्सवात ‘मिसेस सारंगी’ व ‘मिस सारंगी’ स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मिसेस सारंगीसाठी 30 तर मीस सारंगीसाठी 15 मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी धुळे, नाशिक अशा ठिकाणी ‘ऑडिशन्स’ होऊन या स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते. दोन्ही गटातून सुमारे 200 पेक्षा जास्त महिलांनी या स्पर्धेसाठी ‘ऑडिशन्स’ दिल्या होत्या. यापैकी दोन्ही गटांमध्ये 30, 15 याप्रमाणे अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत महिलांबरोबर मुलींनीही आत्मविश्वासाने परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत प्रेक्षकांची मिळवली़ अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागार्पयतच्या महिला व मुली यात सहभागी झाल्या होत्या. यात मुंबई, नाशिक, पुणे, धुळे व नंदुरबार, शहादा, जळगाव येथील स्पर्धक महिला व मुलींनीही सहभाग नोंदविला.
अनेक महिला व मुलींनी ख:या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरीता चेतक फेस्टिवल समिती, पर्यटन विभाग, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी आयोजकांचे कौतुक केले.