आमदार के़सी़ पाडवींचा राजीनामा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:30 PM2019-03-11T12:30:41+5:302019-03-11T12:30:48+5:30

नंदुरबार : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवींनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती़ शुक्रवारी करण्यात आलेल्या या घोषणेनंतर आमदार ...

 MLA KC Padvi resigns to the state's state president | आमदार के़सी़ पाडवींचा राजीनामा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे

आमदार के़सी़ पाडवींचा राजीनामा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे

googlenewsNext

नंदुरबार : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवींनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती़ शुक्रवारी करण्यात आलेल्या या घोषणेनंतर आमदार अ‍ॅड़ पाडवी यांनी राजीनामापत्र काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिले आहे़
अक्कलकुवा मतदार संघाचे काँग्रसचे आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांनी नंदुरबार येथे अनुसुचित जातीत धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार असल्याच्या मुद्द्यावर आदिवासी बचाव महामोर्चा काढण्यात आला होता़ यावेळी झालेल्या सभेत आमदार अ‍ॅड़ पाडवी यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी राजीनामा देत असल्याचे जाहिर केले होते़ त्यांच्या या घोषणेनंतर त्यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आमदारकीचे राजीनामा पत्र पाठवून दिले आहे़ त्यांच्याकडून हे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़
दरम्यान आमदार अ‍ॅड़पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा स्विकारुन घेत केवळ ‘ठीक आहे’ असे उत्तर दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  MLA KC Padvi resigns to the state's state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.