आमदार पाडवी यांनी अधिका:यांसह दिली सलसाडी आश्रमशाळेस भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 10:44 AM2018-09-01T10:44:15+5:302018-09-01T10:44:22+5:30
तळोदा : सलसाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील मयत विद्याथ्र्याच्या गढीकोठडा येथील घरी आमदार उदेसिंग पाडवी व आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी भेट देऊन त्याच्या पालकांचे सांत्वन केले. या वेळी मयत विद्याथ्र्याच्या आईस शासकीय निधीतून मदत म्हणून दोन लाखांचा धनादेशदेखील देण्यात आला. दरम्यान, आमदार पाडवी यांनी अधिका:यांसह आश्रमशाळेस भेट देऊन घटनेची माहिती घेतली. घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी अधिका:यांना दिल्या.
गेल्या सोमवारी तालुक्यातील सलसाडी येथील शासकीय आश्रमशाळेत सहावीत शिकणारा विद्यार्थी सचिन चंद्रसिंग मोरे याचा कुपनलिकेची मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मयत विद्याथ्र्याच्या गढीकोठडा, ता.तळोदा येथील घरी शुक्रवारी आमदार उदेसिंग पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, नाशिक विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, प्रभारी प्रांताधिकारी विजय भांगरे यांनी भेट दिली. या वेळी उपस्थितांनी मयत सचिनची आई कौशल्याबाई मोरे यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांना शासकीय मदतीतून मिळालेला दोन लाखांचा धनादेशही आमदार पाडवी यांच्या हस्ते देण्यात आला. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासनही आमदार पाडवी यांनी दिले. त्यापूर्वी आमदार पाडवी यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह सलसाडी आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी विद्याथ्र्याचा ज्या जागी शॉक लागून मृत्यू झाला त्या जागेची पाहणी केली. याशिवाय घटनेची संपूर्ण माहिती शिक्षकांकडून जाणून घेतली. आश्रमशाळेतील व्यवस्थापनाच्या व निष्काळजीपणामुळे दुर्दैवी घटना घडल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी अधिका:यांना दिल्या.
दरम्यान, सचिव वर्मा यांनी सलसाडी गावातील गावक:यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. शाळा सुरळीत करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी प्रभारी तहसीलदार रामजी राठोड, सहायक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी, शैलेश पटेल, प्रदीप देसाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, लक्कडकोटचे सरपंच जोलू पाडवी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, फौजदार रमेश वावरे, मंडळ अधिकारी ए.जे. वळवी, कौशल सवाई, सुरेंद्र पाडवी, रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.आश्रमशाळेत प्रक्षुब्ध जमावाने अधिकारी व पोलिसांना केलेल्या मारहाणीमुळे शाळेतील मुलेही भेदरलेली होती. साहजिकच सर्व 413 विद्याथ्र्याना पालकांनी आपआपल्या घरी नेले होते. त्यामुळे शाळा सध्या विद्यार्थीविना ओस पडली आहे. शुक्रवारी आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा व आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी नवीन इमारतीची पाहणी केली. या वेळी त्यांनी इमारतीत ज्या काही असुविधा आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात. याशिवाय विद्यार्थी संख्येनुसार शौचालये व स्वच्छतागृहे तयार करण्याच्या सूचनाही प्रकल्पाच्या बांधकाम विभागाला दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रकल्पातील अधिकारी व शाळेच्या कर्मचा:यांची बैठक घेतली.
या घटनेत प्रत्यक्ष ज्यांचा सहभाग असेल अशांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनास मदत करा. आता भयमुक्त वातावरणातून बाहेर पडूनदोन-तीन दिवसात शाळा नियमित सुरू करा. यासाठी पालकांच्या गावी जाऊन संबंधित सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह पालकांची भेट घेऊन विद्याथ्र्याना शाळेत आणण्यासाठी प्रय} करा. या वेळी शिक्षकांनीही त्यांच्यापुढे अडचणी उपस्थित केल्या. त्या तातडीने सोडविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका:यांना दिल्या. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा सोलंकी तर अधिक्षकाचा कार्यभार के.टी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.