शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आमदार बनले एसटी वाहक; अक्कलकुवा ते तळोदा केला प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2022 02:11 PM2022-09-07T14:11:34+5:302022-09-07T14:12:06+5:30

पालकांच्या तक्रारीनंतर बुधवारी आमदार राजेश पाडवी यांनी स्वत: एसटीने प्रवास करत मुलांच्या समस्या जाणून घेतल्या.

MLAs Rajesh Padavi Traveled ST bus from Akkalkuwa to Taloda for school students | शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आमदार बनले एसटी वाहक; अक्कलकुवा ते तळोदा केला प्रवास 

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आमदार बनले एसटी वाहक; अक्कलकुवा ते तळोदा केला प्रवास 

googlenewsNext

नंदूरबार - शहादा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत होती. अनेकदा एसटी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असे. त्यात शाळकरी मुलांच्या पालकांनी स्थानिक आमदार राजेश पाडवी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. एसटी बस थांबा देणे आणि एसटी बसेसची संख्या वाढवणे अशी मागणी पालकांनी आमदारांकडे केली. 

पालकांच्या तक्रारीनंतर बुधवारी आमदार राजेश पाडवी यांनी स्वत: एसटीने प्रवास करत मुलांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार राजेश पाडवी यांनी बसवाहकाची भूमिका बजावत अक्कलकुवा ते तळोदा असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान आमदारांनी स्वतः वाहन चालकांना सूचना करत प्रत्येक गावपाड्यावरील विद्यार्थ्यांना घेत तालुक्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त हात दाखवा आणि एसटी थांबवा यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. 

याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तालुक्यातील गावपाड्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत पोहचण्यासाठी कुठलीही गैरसोय होऊ नये. मुलांना शाळेत योग्य वेळेत पोहचता यावे यासाठी वेळेवर एसटी सोडावी. त्याचसोबत मुलांनी रस्त्यात हात दाखवला तरी एसटी थांबवावी अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 
 

Web Title: MLAs Rajesh Padavi Traveled ST bus from Akkalkuwa to Taloda for school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.