दारू विक्रीच्या वादातून जमावाची एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:12 PM2018-10-27T12:12:27+5:302018-10-27T12:12:32+5:30
नंदुरबार : गावात दारू विक्रीचा ठराव करून दारू विक्री बंद पाडली. याचा राग येवून जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची ...
नंदुरबार : गावात दारू विक्रीचा ठराव करून दारू विक्री बंद पाडली. याचा राग येवून जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना देवमोगरा पुनर्वसन, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी जमावाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, देवमोगरा पुनर्वसन गावात राजकुमार रामा पाडवी व इतरांनी गावातील दारू विक्री बंद व्हावी म्हणून पुढाकार घेतला होता. त्यामुळे अवैध दारू विक्री गावात बंद झाली आहे. त्याचा राग येवून विलास वाहरञया वसावे व इतरांना राग आला होता. त्यामुळे राजकुमार पाडवी यांचा बदला घेण्यासाठी ते संधी शोधत होते. राजकुमार पाडवी हे 25 रोजी सकाळी सात वाजता दुचाकीने आपल्या शेतात जात असतांना त्यांना अडवून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले.
याबाबत राजकुमार रामा पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास वाह:या वसावे, बावा जुगला वसावे, अविनाश वाह:या वसावे, सुनिता गंभीर वसावे, सायसिंग बिज्या वसावे, सामानसिंग बिज्या वसावे, अनिल जावरे यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जाधव करीत आहे.