पालिकेत मोकाट गुरांमुळे धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:10 PM2020-12-25T13:10:59+5:302020-12-25T13:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  नवापूर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरे व उपद्रवाने शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. ...

Mokat cattle run in the municipality | पालिकेत मोकाट गुरांमुळे धावपळ

पालिकेत मोकाट गुरांमुळे धावपळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  नवापूर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरे व उपद्रवाने शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. अनेक नागरिक जखमी        झाले आहेत यासंदर्भात आरपीआयचे नेते तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी नगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोकाट गुरे बांधून आंदोलन केले. नगर पालिका प्रशासनाचा विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लेखी आश्वासन दिल्याशिवाय येथुन उठणार नाही असा पवित्रा घेतल्या नंतर नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, मिलिंद भामरे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करुन लेखी आश्वासन दिले. नवापूर शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करणेबाबत कार्यालयाकडे लेखी निवेदन दिले आहे. सदर निवेदनाच्या अनुषंगाने नवापूर नगरपरिषदेने कारवाई सुरू केली आहे. येत्या पंधरा दिवसात मोकाट गुरांचा बंदोबस्त नगर परिषदेमार्फत करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी गुरांच्या बंदोबस्त नगरपालिकेने १५ दिवसात न  केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष युवा अध्यक्ष राहुल शिरसाठ यांनी मोकाट गुरे व कुत्र्यांच्या नवापूरकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती  दिली. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष राहुल शिरसाठ, दिनेश नगराळे,नटु नगराळे, भटु नगराळे, सोहेब मिर्झा, प्रवीण तिरमली, रमीझ शेख, मुकेश गोसावी, सुनील राठोड, किरण झांझरे, अज्जु मक्राणी,राहुल सोनवणे, गोपी वाघ, संतोष तिरमली आदि यावेळी उपस्थित होते. 
नवापूर शहरातील गुरांना नगरपालिकेत आणून आंदोलन करण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाले.नगर पालिकेबाहेर आंदोलन पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
 

Web Title: Mokat cattle run in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.