वेगवेगळ्या घटनेत दोघांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:04 PM2019-06-04T12:04:31+5:302019-06-04T12:04:39+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत मोलगी व धडगाव पोलिसात गुन्हा दाखल ...
नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत मोलगी व धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना उमरगव्हाण, ता.अक्कलकुवा येथे घडली. गावातील महिला रात्री साडेआठ वाजता नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली असता गावातीलच जगन दिवल्या वसावे (22) याने महिलेशी अलि कृत्य करून विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर संशयीत तेथून पसार झाला. महिलेच्या फिर्यादीवरून जगन दिवल्या वसावे याच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कचरे करीत आहे.
दुसरी घटना वडफळ्या, धडगाव येथे घडली. कलींगड विक्रीचे पैसे मागितल्याचा राग येवून दोघांनी महिलेचा विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना घडली. वडफळ्या येथे डरबूज विक्री करणा:या महिलेकडून सोनू डेबा पावरा, रा.वडफळ्या याने टरबूज खरेदी केले. त्याचे पैसे मागितल्यावर सोनू पावरा याला राग आला त्याने व त्याचा साथीदार हरीण बाळू चव्हाण, रा.धडगाव व इतर चार जणांनी महिलेस बेदम मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोनू डेबा पावरा व हरीण चव्हाण आणि इतर चा जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार साळवे करीत आहे.