ओरपा येथे महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:09 PM2019-07-13T12:09:07+5:302019-07-13T12:09:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली होती़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली होती़ याप्रकरणी उपसरपंचासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े
उमरागव्हाण येथे सध्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा वाद सुरु आह़े दरम्यान बुधवारी सकाळी 11 वाजता ओरपा येथील महिला ग्रामपंचायत येथे जात असताना उपसरपंच शंकर खाअल्या वसावे याने पिडितेचा हात पकडून साडीचा पदर खेचत विनयभंग केला होता़ दरम्यान शिवाजी मांगठा वसावे याने पिडितेस शिवीगाळ केली तर मगन रामा वसावे व केवलसिंग सत्या वसावे या दोघांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पिडितेने मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करत आहेत़ पिडितेने गावपंचात बसवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला़ यानंतर पोलीसात फिर्याद दिल्याचे म्हटले आह़े 10 जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आह़े