माळगेंदा शेतीच्या वाटणीवरून दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:22 PM2018-05-17T12:22:10+5:302018-05-17T12:22:10+5:30

विनयभंगासह मारहाणीचा परस्परविरोधी गुन्हा

Molgenda farming: Two groups assault | माळगेंदा शेतीच्या वाटणीवरून दोन गटात मारहाण

माळगेंदा शेतीच्या वाटणीवरून दोन गटात मारहाण

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून माळगेंदा, ता.धडगाव येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. 
माळगेंदा, ता.धडगाव येथील पावरा कुटूंबात गेल्या अनेक वर्षापासून शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. त्या वादाचे पर्यावसान 15 मे रोजी हाणामारीत झाले. जाडय़ा सरदार पावरा व जामसिंग उल्या पावरा यांच्यात हा वाद होता. 15 रोजी सकाळी आठ वाजता जाडय़ा पावरा यांच्या प}ी अंगणात उभ्या असतांना जमावाने येवून त्यांना व त्यांच्या पतीला बेदम मारहाण केली. 
यावेळी जमावाने महिलेचा विनयभंग देखील केला. महिलेच्या फिर्यादीवरून जामसिंग उल्या पावरा, राजा आबला पावरा, तुकाराम उल्या पावरा, रामा उल्या पावरा, युरक्या राज्या पावरा, पिंजराबाई उल्या पावरा, फुतीबाई राज्या पावरा, ओमीबाई जामसिंग पावरा सर्व माळगेंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद फुंतीबाई राजा पावरा यांनी दिली. शेतीच्या वाटणीवरून जमावाने लाकडी डेंगारा, लाठय़ा काठय़ांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जाडय़ा सरदार पावरा, केशव सरदार पावरा, सुरेश सरदार पावरा, जितेंद्र जाडय़ा पावरा, सुनती जाडय़ा     पावरा, शिवाजी सरदार पावरा, राकेश सरदार पावरा, लुल्या फुल्या पावरा, रोहिदास लुह:या पावरा, वसंत   अबला पावरा, वेथ अबला पावरा, सरदार फत्या पावरा, जात्र्या सरदार पावरा, सर्व रा.माळगेंदा, ता.     धडगाव यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तपास हवालदार दिपक गोरे करीत आहे.
 

Web Title: Molgenda farming: Two groups assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.