सोमवार ठरला ‘कही खुशी कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:21 PM2020-07-21T12:21:21+5:302020-07-21T12:23:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या शहादा शहरासह तालुक्याला सोमवारचा दिवस ...

Monday was 'Kahi Khushi Kahi Gum' | सोमवार ठरला ‘कही खुशी कही गम’

सोमवार ठरला ‘कही खुशी कही गम’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या शहादा शहरासह तालुक्याला सोमवारचा दिवस ‘कही खुशी कही गम’ असा ठरला. सोमवारी तब्बल शहरातील पाच व तालुक्यातील तोरखेडा येथील एक अशा सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना जिल्हा रुग्णालयातर्फे घरी पाठविण्यात आले. तर दिवसभरात शहरात गरीब-नवाज कॉलनीत एक, कुंभारगल्ली व गांधीनगर भागातील मयताच्या कुटुंबातील सात असे आठ बाधित रुग्ण आढळून आले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा मुंबई येथून परत शहाद्याकडे येणाºया मलोणी येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
२२ एप्रिलला शहरात पहिला बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मे महिन्यापर्यंत ही संख्या १० झाली होती. या कालावधीत या दहापैकी एकाचे निधन झाले होते तर उर्वरित नऊ रुग्णांनी कोरोना संक्रमणावर यशस्वीपणे मात केली होती. मात्र जून महिन्यात पुन्हा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर जुलै महिन्याच्या गतसप्ताहात शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत चालली होती.
सोमवारअखेर शहरात व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा हा ९० झाला आहे. पैकी १० मयत झाले असून ४३ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सोमवारी शहरासह तालुक्यातील २४ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. पैकी १६ अहवाल निगेटीव्ह आले असून आठ कोरोना बाधित आले आहे. नव्याने आढळून आलेल्या या बाधित रुग्णांमध्ये कुंभारगल्ली व गांधीनगर येथील मयत रुग्णाच्या कुटुंबातील सात सदस्यांचा समावेश आहे
तालुक्यातील तोरखेडा येथील एक व शहरातील मुलब्रिज नगर, सदाशिवनगर व विजयनगर येथील प्रत्येकी एक तर डोंगरगाव रस्त्यावरील दोन अशा पाच बाधितांनी कोरोना संक्रमणावर यशस्वीपणे मात केली आहे. उपचाराअंती बºया झालेल्या सर्वांना सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे घरी पोहोचविण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील ४० वर्षीय पुरुषाचा कोरोना बाधित अहवाल आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील बाधित रुग्णाच्या अतिसंपर्कातील तीन, पाडळदा व सोनवद येथील बाधित रुग्णाच्या अतिसंपर्कातील व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
दरम्यान, रविवारी मलोणी येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून मुंबई येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होता. मुंबई येथून परत मलोणी येथे येत असताना त्याचे रस्त्यात निधन झाले. मलोणी परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित न करता अन्य उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या अतिसंपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात असून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णाच्या परिसरात निर्जंतुकीकरण केले जात आहे.

Web Title: Monday was 'Kahi Khushi Kahi Gum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.