पालकमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:54 PM2019-08-11T12:54:43+5:302019-08-11T12:54:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून ...

Monitoring of Damages by Guardian Ministers | पालकमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी

पालकमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना रावल यांनी संबंधित विभागाच्या अधिका:यांना दिल्या.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शहादा तालुक्यातील अनेक भागात भेटी देऊन अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतांची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, ससप्रचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोज खैरनार, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, ग्रामसेवक पी.डी. पाटील आदी उपस्थित होते.
सारंगखेडा येथील कालिदास शंकर मोरे, विलास वासुदेव चौधरी, सुनील शांतीलाल मोरे, मधुकर सेना साटोटे, मुरलीधर चिंधा मोरे, देविदास सेना साटोटे यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी पालकमंत्री रावल यांनी केली. तसेच वैजाली, डामरखेडा, पाडळदा आदी ठिकाणी पडझड झालेल्या घरांची व शेतीच्या नुकसानीचीही पाहणी त्यांनी केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिका:यांना दिल्या. रायखेड येथे घराची भिंत पडून कांताबाई वीरसिंग भिल (48) या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचे दोन्ही मुले जखमी झाले आहेत. रायखेड येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन चार लाख रुपयांचा धनादेश कांताबाईचे मामा सरपंच सनू पूना मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.
 

Web Title: Monitoring of Damages by Guardian Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.