पाणी नसल्याने मान्सून फेस्टिवल रद्द : सरदार सरोवर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 10:35 AM2018-09-01T10:35:49+5:302018-09-01T10:35:59+5:30

जगातील सर्वात उंच स्टॅच्यूचे काम अंतिम टप्प्यात

Monsoon festival canceled due to lack of water: Sardar Sarovar Project | पाणी नसल्याने मान्सून फेस्टिवल रद्द : सरदार सरोवर प्रकल्प

पाणी नसल्याने मान्सून फेस्टिवल रद्द : सरदार सरोवर प्रकल्प

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रचंड घाईगर्दी करून गुजरात सरकारने सरदार सरोवर प्रकल्पावर गेट बसवून प्रकल्पाची उंची 138 मीटर्पयत पूर्ण केली असली तरी गेल्या दोन वर्षात पाणीच नसल्याने हा प्रकल्प अद्यापही भरलेला नाही. परिणामी या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने सुरू केलेला मान्सून फेस्टिवल सलग दुस:या वर्षी रद्द करावा लागला आहे. दरम्यान, जगातील सर्वात उंच स्टॅच्यूू उभारण्याचे काम या ठिकाणी अंतिम टप्प्यात असून 31 ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण करण्यासाठी तयारी सुरू आहे.
महाकाय सरदार सरोवर प्रकल्प हा सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. या प्रकल्पामुळे लाभहानीच समीकरण तथा पर्यावरणाची हानी आणि पुनर्वसन हे विषय जागतिक स्तरावर गाजले. परंतु सर्व संघर्षानंतर व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून हा प्रकल्प अखेर पूर्ण रेटला आहे. या प्रकल्पाची उंची कमी करण्याबाबत नर्मदा बचाव आंदोलनाने लढा दिला. पण, त्यानंतरही प्रकल्पाची उंची 138 मीटर्पयत पूर्ण करण्यात आली आहे. पण धरणाची उंची पूर्ण झाल्यापासून अर्थात धरणावरील गेट बसविल्यापासून हा प्रकल्प मात्र अद्यापही पूर्ण भरलेला नाही. 
गेल्या वर्षी पाऊस नसल्याने हा प्रकल्प जवळपास दहा मीटरने खाली होता. यावर्षीदेखील या प्रकल्पात आतार्पयत 121.67 मीटर्पयतच पाणीसाठा झाला आहे. अजून 16 मीटरपेक्षा अधिक हा प्रकल्प रिक्त आहे. प्रकल्प भरला नसल्याने या ठिकाणी धरणावरून फेसाळणा:या धबधब्याचे मनोहारी दृष्य गेल्या दोन वर्षापासून लुप्त झाले आहे. यापूर्वी या धरणाची उंची 121.85 मीटर असताना पावसाळ्यात धरणाच्या भिंतीवरून पाणी कोसळत होते. 
अक्षरश: नायजेरिया  धबधब्याची प्रचिती येथे पर्यटकांना येत होती. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही प्रचंड    राहत होती. त्याची नोंद घेत गुजरात सरकारनेही 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर  असा महिनाभर मान्सून फेस्टिवलचे आयोजन सुरू केले होते. पण दोन वर्षापासून हा फेस्टिवल रद्द झाला आहे.
पाण्यामुळे फेस्टिवलच रद्द झाला नाही तर प्रकल्पाची वीजनिर्मिती देखील थांबली आहे.सरदार सरोवर प्रकल्पाजवळच स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार पटेल यांचा 182 मीटर उंचीचा  भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकसित करण्याचे काम गुजरात सरकारने सुरू केले आहे. या पुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून साधारणत: येत्या 31 ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी हा स्टॅच्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे प्रय} सुरू आहेत. या स्टॅच्यूसाठी सर्व भाग ब्रांझपासून तयार करण्यात आले असून ते चीनमधून तयार करून येत आहेत. एक एक भाग आणल्यानंतर तो जोडला जात आहे. या स्टॅच्यूच्या ठिकाणी एखाद्या महाबेटासारखे वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी बोटिंग व अन्य सुविधाही करण्यात येणार आहेत. याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हॉटेलही उभारली जात आहे. बडोदा ते सरदार सरोवर प्रकल्पार्पयत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय विमानतळही उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे एकूणच हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या दृष्टीनेच विकसित होत आहे. साहजिकच सध्या ओस पडलेली पर्यटकांची गर्दी स्टॅच्यूच्या लोकार्पणानंतर पुन्हा या ठिकाणी वाढणार आहे.
हा स्टॅच्यू आकारास आल्यानंतर जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ठरणार आहे. सध्या सर्वात उंच स्टॅच्यू चीनमधील स्प्रिंग टेम्पल बुद्धा हे आहे. त्याची उंची 153 मीटर आहे. त्या पाठोपाठ जपानमधील उशीकु दाईबुत्सू याची उंची 120 मीटर आहे. रशियातील द मदरलॅन्ड कोल्स  याची उंची 85 मीटर आहे तर  यूएसए मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची 63 मीटर आहे. त्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे 182 मीटर उंचीचे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ठरणार आहे. या स्टॅच्यूच्या ठिकाणी एकाचवेळी 15 हजार पर्यटक थांबू शकतील. एका वेळी 200 लोकं जाऊ शकतील. 
 

Web Title: Monsoon festival canceled due to lack of water: Sardar Sarovar Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.