ईशान्येकडील वा-यांचा प्रभाव वाढल्याने राज्यभरात मान्सून परतला

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: August 13, 2018 11:37 AM2018-08-13T11:37:00+5:302018-08-13T11:39:14+5:30

‘आयएमडी’ची माहिती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Monsoon returns from across the state due to the impact of northeast people | ईशान्येकडील वा-यांचा प्रभाव वाढल्याने राज्यभरात मान्सून परतला

ईशान्येकडील वा-यांचा प्रभाव वाढल्याने राज्यभरात मान्सून परतला

Next
ठळक मुद्देमान्सून ट्रफ उत्तरेत सक्रीय15 ते 18 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ईशान्येकडील मान्सून वा:यांचा जोर वाढू लागला असून हवेचा दाब कमी झाला आह़े शिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यातून मध्य महाराष्ट्रासह कोकण, विदर्भात श्रावण सरी पुन्हा परतल्या आहेत़ असे असले  तरी खान्देशात जुन व जुलै महिन्यातील पावसाच्या खंडाची तुट परतीचा पाऊस भरुन काढण्याची शक्यता कमी असल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात येत आह़े 
तब्बल 45 दिवसानंतर बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडी  घडल्या आहेत़ उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आह़े त्यामुळे याचे सकारात्मक परिणाम म्हणून राज्यात विविध ठिकाणी तुरळक स्वरुपाचा का होईना परंतु मान्सून परतला आह़े हवेच्या दाबाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने पुढील मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झालेले आहेत़ सध्या हवेचा दाब कमी असल्याने खान्देशात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावलेली दिसून येतेय़ परंतु ही स्थिती फार काळ टिकणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े 25 ऑगस्टनंतर पुन्हा हवेचा दाब वाढणार असून त्यामुळे मान्सूनला अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आह़े हिमालयाच्या पायथ्याची बाष्पयुक्त ढगांना निर्माण झालेला अडथळा दूर झाल्याने आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहू लागलेले आहेत़ त्यामुळे हा बदलाचा कालखंड सुरु असून यामुळे खान्देशात बहुतेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान, तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आह़े परंतु त्यानंतर हवेच्या दाबावर मान्सूनची स्थिती अवलंबून असणार असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े 
मान्सून ट्रफ उत्तरेत सक्रीय
मान्सून ट्रफ हा उत्तरेकडे अधिक सक्रीय असल्याने उत्तरेकडील प्रदेशात त्यापासून मोठय़ा प्रमाणावर मान्सून मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े खान्देशासह मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसार्पयत तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता ू‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात येत आह़े खान्देशात जुन व जुलै महिन्यात पावसाच्या पडलेल्या खंडाची तुट भरुन काढण्याची सर्व भिस्त आता परतीच्या पावसावर आह़े ही संपूर्ण तुट भरुन काढणे परतीच्या पावसाने शक्य नसले तरी, मागील काही वर्षाच्या परतीच्या पावसाची टक्केवारी बघता साधारणत 60 टक्के तुट भरुन निघण्याची शक्यता ‘आयएमडी’तर्फे व्यक्त होत आह़े 
2015 साली नंदुरबारात सरासरी 379 मि़मी इतका परतीचा पाऊस झालेला होता़ त्याच प्रमाणे 2016 - 357 मि़मी़ व मागील वर्षी 458 मि़मी इतका परतीचा पाऊस झाला असल्याची माहिती देण्यात आली़ परतीच्या पावसाचा कालखंड साधारणत सप्टेंबरच्या शेवटापासून सुरु होत असतो़ 2016 मध्ये 15 सप्टेंबरपासून ईशान्य-पूर्व भारतातून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ तर, 14 ऑक्टोबरपासून मध्य महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होऊन केवळ दोनच दिवसात म्हणजे 16 ऑक्टोबर्पयत परतीचा पावसाचा कालखंड पूर्ण झाला होता़
तर, 2017 साली 27 सप्टेंबरपासून पंजाब, हरियाणा येथून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ 15 ऑक्टोबर पासून मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ साधारणत 24 ऑक्टोबर्पयत परतीच्या पावसाचा कालखंड पूर्ण झालेला होता़ यंदाही साधारणत सप्टेंबरच्या मध्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आलेली आह़े मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसातून चांगला मान्सून मिळाल्याचे मागील आकडेवारीतून दिसत़े
 

Web Title: Monsoon returns from across the state due to the impact of northeast people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.