बेघर संघर्ष समितीचा नंदुरबारात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:33 PM2021-01-08T13:33:26+5:302021-01-08T13:33:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बेघर संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बेघर संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ज्या झोपड्या ४० ते ५० वर्षांपासून शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून आहेत त्याच जागेवचा सर्वे करून शासन योजनेनुसार घरकुले बांधून द्यावी. ज्यांनी शासनाची दिशाभूल करून घरकुले ताब्यात घेतली आहेत त्यांना त्यातून बाहेर काढावे व पात्र लाभार्थींना ते द्यावे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा तस्करी करणारे यांचा बंदोबस्त करावा यासह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शहरातील कचेरी मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलावरशा कादरशा, रेहाना गनी खाटीक यांच्यासह मोठ्या संख्येेने बेघर नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.