निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर यंदा मध्य प्रदेशात गणेशमूर्तीची अधिक विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:11 PM2018-09-09T13:11:23+5:302018-09-09T13:11:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मध्यप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा गणेशोत्सवासाठी नंदुरबारातून मोठय़ा प्रमाणावर मूर्ती नेल्या जात आहेत. याशिवाय गुजरातमध्ये देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत मूर्ती नेण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी शेजारच्या या दोन्ही राज्यांनी तारल्याने गणेशमूर्ती कारागिरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नंदुरबारच्या मूर्ती कारागिरांना यंदा मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालावरील जीएसटीचा फटका बसला होता. याशिवाय नंदुरबार, धुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे गणेशमूर्त्ीना मागणीबाबत कारागिरांना चिंता होती. परंतु यंदा मध्यप्रदेश व गुजरातने तारल्याचे चित्र मूर्ती विक्रीतील बाजारात दिसून येत आहे. या दोन्ही राज्यात गेल्या काही वर्षाच्या तुलनेत 15 ते 20 टक्के अधीक मूर्ती नेल्या जात असल्याचे मूर्ती कारागिरांनी सांगितले. मध्यप्रदेशात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे गावोगावच्या मंडळांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष व नेत्यांकडून त्यांना मूर्तीसाठी आर्थिक मदत होत आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील खेतिया, पानसेमल, खरगोन, सेंधवा यासह इतर भागातील मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मूर्ती घेवून जात आहे. साधारणत पाच ते दहा फूटर्पयतच्या मूर्त्ीना मागणी आहे. याशिवाय गुजरातमध्ये देखील यंदा ब:यापैकी मूर्ती नेल्या जात आहेत. यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे मूर्ती कारागिरांच्या व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता असता असतांना या दोन्ही राज्यांनी ब:यापैकी मूर्ती व्यावसायिकांना तारले आहे.