सकाळी लागतात रांगा व दुपारी मात्र शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:41 PM2020-04-18T12:41:40+5:302020-04-18T12:41:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सर्वच एटीएम केंद्रांमध्ये दुपारी 12 वाजेर्पयत मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत आहेत. परंतु दुपारनंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील सर्वच एटीएम केंद्रांमध्ये दुपारी 12 वाजेर्पयत मोठय़ा प्रमाणावर रांगा लागत आहेत. परंतु दुपारनंतर संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी होत असल्यामुळे शुकशुकाट दिसून येत आहे. रविवार वगळता सर्वच ठिकाणी पुरेशी रक्कम राहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रत्येकजण एटीएम वापरतांना काळजी घेत आहे.
कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभुमीवर एटीएम केंद्रात देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना सर्व बँकांना यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसे निर्देश असलेला सुचना फलक देखील प्रत्येक एटीएम केंद्रात लावण्यात आला आहे.
पुरेशी रक्कम
शहरातील सर्व एटीएम केंद्रांमध्ये पुरेशी रक्कम राहिल याची खरबदारी घेण्यात येत आहे. जास्तीत जास्त एटीएमचा वापर करून बँकांमधील गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याची खबरदारी सर्व बँका घेत आहेत. गेल्या शनिवारी व रविवारी काही एटीएममध्ये रक्कम नसल्याने ते बंदच ठेवण्यात आले होते. परंतु सोमवारपासून पुरेशी रक्कम प्रत्येक एटीएम केंद्रात राहत आहे.
सकाळी गर्दी
शहरातील सर्वच एटीएम केंद्राबाहेर दुपारी 12 वाजेर्पयत मोठय़ा प्रमाणावर रांगा दिसून येत आहेत. दुपारी 12 वाजेनंतर संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे दुपारनंतर शुकशुकाट असतो. रात्री काही ठिकाणी तुरळक स्वरूपात गर्दी दिसून येत आहे.
सॅनिटायझरची सोय
काही एटीएम केंद्र हे बँकेच्या आवारातच असल्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक सॅनिटायझरची सोय करून देत आहेत. बँक व एटीएममध्ये येणा:या प्रत्येकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट असतो. अशा वेळी त्याचा गैरफायदा चोरटय़ांकडून घेतला जावू नये यासाठी सुरक्षा रक्षकांना अलर्ट करण्यात आले आहे.
याशिवाय पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे वाहने देखील नियमित एटीएमची तपासणी करीत आहेत. सुरक्षेबाबत सर्वच पातळीवर काळजी घेवून त्यादृष्टीने नियोजन देखील करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.