मोटारसायकल चोरटे जेरबंद

By admin | Published: January 20, 2017 12:27 AM2017-01-20T00:27:40+5:302017-01-20T00:27:40+5:30

चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रय}ात असताना एकास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले.

Motorbike robbery | मोटारसायकल चोरटे जेरबंद

मोटारसायकल चोरटे जेरबंद

Next

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरात चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रय}ात असताना एकास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्याच्याकडून 15 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करून मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न  झाले आहे.
जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांना तळोदा तालुक्यात मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या टोळीवर गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लक्ष ठेवून होते. टोळीतील एकाला तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरात मोटारसायकल विक्री करण्याच्या प्रय}ात असताना त्यास सापळा लावून पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याला चोरीसाठी मदत करणारे दोन व मोटारसायकल विक्रीसाठी हस्तक म्हणून काम करणारा एक अशा तीन आरोपींची माहिती दिली. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. चारही आरोपींनी गुन्ह्यांची कबुली देत नंदुरबार शहर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा या भागातून तसेच गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून व धुळे जिल्ह्यातून 15 मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली. या 15 मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही गहाण ठेवल्या होत्या तर काही अल्पदरात विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीकडून अजून काही चोरीच्या मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, हे.कॉ. रवींद्र लोंढे, पंढरीनाथ ढवळे, चंद्रकांत शिंदे, विकास पाटील, अनिल गोसावी, रवींद्र पाडवी, योगेश सोनवणे, दीपक गोरे, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, मुकेश अहिरे, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, पुष्पलता जाधव, विकास अजगे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, किरण पावरा, राहुल भामरे, पंकज महाले, अमोल पवार, महेंद्र सोनवणे, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title: Motorbike robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.