निकालासाठी दुर्गम युवकांनी गाठल्या टेकडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:49 AM2019-10-25T10:49:03+5:302019-10-25T10:49:31+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अन्य भागांसह दुर्गम भागात  विधानसभा निवडणूक निकालाची  उत्सुकता  लागून होती. परंतु भ्रमणध्वनीलाच रेंज मिळत ...

Mountains reached by remote youths for settlement | निकालासाठी दुर्गम युवकांनी गाठल्या टेकडय़ा

निकालासाठी दुर्गम युवकांनी गाठल्या टेकडय़ा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अन्य भागांसह दुर्गम भागात  विधानसभा निवडणूक निकालाची  उत्सुकता  लागून होती. परंतु भ्रमणध्वनीलाच रेंज मिळत नव्हती, त्यामुळे  रेंजच्या शोधार्थ दुर्गम भागातील बहुतांश युवकांनी टेकडय़ा गाठल्या. टेकडय़ांवर रेंजच्या धरसोड स्थितीतच या युवकांनी निकालाचा धावता आनंद घेतला. 
 आचारसंहितेपासून रंगणा:या चर्चामध्ये अद्ययावत माहिती ठेवण्याचा प्रत्येक जण प्रय} करीत होता. राजकीय माहिती अद्यायावत ठेवण्यासाठी तेथील जनता भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याना देखील ठिकठिकाणी संपर्क साधत होता. 
संपूर्ण जगभर संपर्काचे महाजाळे निर्माण झाले असले तरी संपर्काच्या बाबतीत धडगाव व मोलगी हा परिसर मात्र अपवाद ठरतो, दळणवळण व संपर्काची अनेक साधने आली असतानाही या भागात पुरेशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाही. त्यामुळे हा परिसर मागास शिवाय उपेक्षित देखील ठरतो. त्यामुळे या भागातील जनतेला काही समस्याशी समाना करावा लागत आहे. असे  असले तरी या समस्यांवर दुर्गम भागातील युवक मात करण्याचा  प्रय} करीत असून असाच  प्रय} यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी युवकांकडून झाला आहे. बहुतांश गावांमध्ये         रेंजच मिळत नसल्यामुळे निकालाच्या दिवशी दुर्गम भागातील युवक  मोठय़ा कठीण परिस्थितीत निवडणूक निकालाची माहिती मिळविण्याचा प्रय} करताना दिसून आले. काही वेळा मोठय़ा टेकडीच्या अध्र्यावरही रेंज मिळत असते. त्यामुळे युवक अवघड भागातूनही निकालाची  माहिती मिळविण्याचा प्रय} करीत होते. 
अशी परिस्थिती धडगाव तालुक्यातील कुंडल, खांडबारा, मोजरा, तोरखापाडा, खडक्या, खुंटामोडी तर अक्कलकुवा तालुक्यातील जामली, पिंवटी, उमटी या गावांमध्ये दिसून आली. या गावांमध्ये निकालाच्या दिवशीच   नव्हे तर नेहमीच चांगली रेंज राहत नसल्याचे सांगण्यात येते.   कुंडल, ता.धडगाव येथील एकाउंच टेकडीवरुन निवडणऊक निकालाची माहिती घेतांना विलास पाडवी,  चंद्रसिंग पाडवी, हेमंत पाडवी, शांतीलाल पाडवी, सचिन पाडवी, अश्विन, बादल पाडवी, अंकुश पाडवी, संजय पाडवी वयोगेश पाडवी  यांच्यासह अन्य युवक आढळून     आले. 

धडगाव व मोलगी परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी बीएसएनएल व अन्य काही कंपन्यांमार्फत मनोरे उभारण्यात आले आहेत. परंतु यातून नागरिकांना दळणवळणाची योग्य ती सेवा दिली जात नाही. त्यामुळे तेथील नागरिकांमार्फत नेहमीच तक्रारी करण्यात आल्या परंतु संबंधित यंत्रणांमार्फत मागण्यांची दखल घेतली गेली नाही. परिणामी अजूनही (काही प्रमुख गावे वगळता)  हा भाग संपर्क क्षेत्रात येऊ शकला नाही. असे असले तरी या भागातील प्रत्येक नागरिकांकडे भ्रमणध्वनी आढळून येत आहे. त्यातच बहुतांश युवकांकडे महागडे भ्रमणध्वनी असून ते नेहमीच व्हॉट्सअपचा वापर देखील करीत आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच माहिती मिळविण्याचा युवकांनी प्रय} केला.
 

Web Title: Mountains reached by remote youths for settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.