आशांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:09 PM2020-01-11T13:09:29+5:302020-01-11T13:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना नंदुरबार जिल्हा व अंशकालीन स्त्री परिचर संघटनाच्या वतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना नंदुरबार जिल्हा व अंशकालीन स्त्री परिचर संघटनाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले़
आंदोलनात राजू देसले, वैशाली खंदारे, ईश्वर पाटील, विजय दराडे, ललिता पाटिल, गुली पावरा, रत्ना नंदन, अनिता महिरे, कल्पना गावीत, मनिषा रहासे, रामेश्वरी वसावे यांच्यासह आशासेविका उपस्थित होत्या़ यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ निवेदनात, भारतीय श्रम परिषदेच्या ४५ व ४६ व्या शिफारसी नुसार आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन १८ हजार वेतन द्यावे, ६ हजार रुपये भविष्य निर्वाह निधी द्यावा, सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात, सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण बंद कराव, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम स्वरुपी लागू करावे, केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व सामाजिक योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, गट प्रवर्तकांना संप काळातील वेतन देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना मिळणारे बोनस आशाना व गटप्रवर्तकांना लागू करावे, गटप्रवर्तकांना कामाच्या मोबदल्या ऐवजी वेतन मिळाले पाहिजे, आशांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या कामाचा मोबदला २० रुपयांप्रमाणे द्यावा, जननी सुरक्षा योजनेंतर्गत कोणताही भेदभाव न करता मोबदला देण्यात यावा, मासिक, त्रैमासिक, आॅडिट, जिल्हा व तालुकास्तरीय बैठकांचा गटप्रवर्तकांना वेगळा कामाचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ दुपारी सुरु असलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील आशांनी सहभाग नोंदवला होता़