खासदार हीना गावीतांवर आमदार पाडवींच्या आरोपामुळे भाजपात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:45 PM2017-10-22T12:45:14+5:302017-10-22T12:45:23+5:30
क्षांतर्गत खळबळ उडाली
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 22- भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुन्हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षा व खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यावर आरोप केल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आह़े
सोमावल ता़ तळोदा येथील गॅस वाटप कार्यक्रमात आमदार उदेसिंग पाडवी हे म्हणाले होते की, मतदारसंघात आपला प्रभाव वाढत आह़े त्यामुळे मंत्रीमंडळात स्थान मिळू शकते, ते मिळू नये, यासाठी खासदार डॉ़ हीना गावीत यांच्याकडून डावलले जात आह़े शहादा तळोदा मतदारसंघात विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या गॅस शेगडी वाटप कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक लांब ठेवले जात आह़े
खासदार डॉ़ गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या उपस्थितीत बोरद, मोड, तळवे, आमलाड, रोझवा, सोमावल, या ठिकाणी गॅस शेगडी वाटप कार्यक्रम झाले, सोमावलच्या मुख्य कार्यक्रमात बोलवण्यात आले नाही़ निवडून आल्यापासून सतत हा अनुभव येत आह़े विधानसभा निवडणूकीतही माझा पराभव व्हावा, म्हणून त्यांचे प्रयत्न होते असा आरोप त्यांनी केला़
निवडणूका आल्या की त्यांचे आरोप सुरू होतात - खासदार हीना गावीत
आमदार उदेसिंग पाडवी हे माङया वडीलांसमान आहेत़ आम्ही दोघे एकाच पक्षाचे आहोत़ भाजपमध्ये एक वेगळी शिस्त आह़े त्यामुळे जर आमदार पाडवी यांना काही सांगायचे होते तर त्यांनी थेट मला सांगितले असते, तर बरे झाले असते, पण निवडणूका आल्या की, ते सातत्याने असेच आरोप करतात़ गॅस वाटप कार्यक्रमासंदर्भात पक्षाच्या शिस्तीनुसार तालुकाध्यक्षांमार्फत निरोप व निमंत्रण दिले होत़े असे असतानाही त्यांनी आपल्याला डावलले जाते हे आरोप करणे चुकीचे आह़े आपण त्यांच्या मतदारसंघात पक्ष कार्य वाढवण्यासाठीच कार्यक्रम घेत असल्याने याचा उलट त्यांनाच फायदा होणार आह़े एक खासदार या नात्याने आपल्याला संपूर्ण मतदारसंघात फिरावे लागते, केंद्राच्या व विकासाच्या योजना लोकांर्पयत पोहोचवण्यासाठी काम करावे लागत़े आपण पक्षाच्या शिस्तीत राहूनच काम करीत असून आमदार पाडवी यांचे आरोप गैरसमजातून आहे, की हेतूत: आहेत ते कळत नाही़