एमपीएससी परीक्षा होणार सहा केंद्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:47 PM2020-10-08T12:47:12+5:302020-10-08T12:47:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परीक्षा ११ आॅक्टोबर 2020 रोजी नंदुरबार येथे घेण्यात ...

MPSC exams will be held at six centers | एमपीएससी परीक्षा होणार सहा केंद्रावर

एमपीएससी परीक्षा होणार सहा केंद्रावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा पुर्व परीक्षा ११ आॅक्टोबर 2020 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी २०० मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
शहरात श्रीमती एच.जी.श्रॉफ हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज मोठा मारुती मंदिराजवळ नंदुरबार, जी.टी.पाटील महाविद्यालय भाग-एक आणि भाग-दोन नंदुरबार, दुगार्बाई रघुवंशी हायस्कुल मुख्य डाक कार्यालय जवळ शनि मंदिर रोड नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय नेहरु चौक स्टेशन रोड नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल मुख्य डाक कार्यालय जवळ अंधारे स्टॉप, नंदुरबार अशा सहा उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी
सात वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात म्हटले आहे.

Web Title: MPSC exams will be held at six centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.