अवघ्या एक रुपया भाडे पट्टय़ाने गाळ जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:39 PM2018-12-01T12:39:06+5:302018-12-01T12:39:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फेविविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता जलसंपदा, मृद ...

Mud land with only one rupee rental plot | अवघ्या एक रुपया भाडे पट्टय़ाने गाळ जमीन

अवघ्या एक रुपया भाडे पट्टय़ाने गाळ जमीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फेविविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील, तलावाखालील गाळपेर जमीन शेतक:यांना रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पीक उत्पादनासाठी नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्टयावर देण्यात येणार आहे. दरम्यान, मका व ज्वारीचे 22 टन बियाणे सिंचन सुविधा असलेल्या पाच हजार 166 शेतक:यांना चारा उत्पादनासाठी वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चार तालुके पुर्ण तर दोन तालुक्यांमधील काही मंडळे ही दुष्काळी जाहीर करण्यात आली आहेत. अपु:या पजर्न्यमानामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई देखील मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. 
ही बाब लक्षात घेता चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
चा:याची उपलब्धता
 जिल्ह्यात एकुण जनावरांची संख्या लक्षात घेता मोठय़ा पाळीव जनावरांची संख्या चार लाख पाच हजार 75, शेळ्या, मेंडय़ांची संख्या दोन लाख 85 हजार 904 इतकी आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार पडीकक्षेत्र वनक्षेत्र तसेच खरीप पिकांपासून मिळणारा चारा उपलब्ध पशुधनास पुढील चार महिन्यासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात उत्पादीत होणारा चारा जिल्हाबाहेर वाहतुकीस व विक्रीस जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत मका, ज्वारीचे 22 टन इतके बियाणे जिल्ह्यातील पाच हजार 16 शेतक:यांना चारा उत्पादनासाठी मोफत वाटप करण्यात आले आहे. 
नाममात्र भाडय़ाने गाळ जमीन
जिल्ह्यातील जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील , तलावाखालील गाळपेर जमीनी शेतक:यांना चारा पीक उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात अवघ्या 1 रुपये नाममात्र दराने भाडेतत्वावर ते उपलब्ध होणार आहे. जेणेकरून गाळपेर जमीनीमध्ये जनावरांसाठी सुयोग्य अशी वैरण व चारापिके घेता येतील. तसेच शेतक:यांकडे उपलब्ध अलसेली वैरण निकृष्ठ चारा सकस करणे, चारा कटाई करून पशुधनास खाण्यासाठी वापरणे, अझोला निर्मिती आदी उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील पशुपालक शेतक:यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे.
आठ विहिरी अधिग्रहीत 
तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार तालुक्यातील 32 गावांपैकी आठ गावात तहसीलदारांनी खाजगी विहिरी अधिग्रहीत करून त्याद्वारे गावक:यांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यात तलवाडे बुद्रूक, रनाळे, घोटाणे, बलवंड, निंबोणी, दहिंदुले, वेळावद, मांजरे या गावांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात आणखी काही गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. 
मजुरांना कामे उपलब्ध
जिल्ह्यातील मजुरांना कामाअभावी परराज्यात, परजिल्ह्यात स्थलांतरीत होऊ नये यासाठी गावातच रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात येत्या वर्षभरात 93 हजार 929 मजूर क्षमतेची 27 हजार 906 कामे मंजुर करण्यात आली आहेत. त्यावर 40 कोटी नऊ लाख रुपये खर्चाची तरतूद देखील जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे. 
आजच्या स्थितीत जिल्ह्यात एक हजार 187 कामे सुरू असून त्यावर पाच हजार 748 मजुर कार्यरत आहेत. मागेल त्याला काम देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
चार महिना पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा अहवाल कृषी विभागाने आधीच दिला आहे. 
रब्बी हंगाम देखील यंदा अपेक्षीत प्रमाणात येणार नसल्यामुळे रब्बी पिकांपासूनचा चारा देखील उपलब्ध होणार नाही.
त्यामुळे जास्तीत जास्त चारा उत्पादन व्हावे यासाठी कृषी विभागाचा प्रय} सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी याबाबत आढावा बैठका देखील वेळोवेळी घेतल्या आहेत. 

Web Title: Mud land with only one rupee rental plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.