मुक्या जीवांची होऊन उतराई, आली घरोघरी आनंदाची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:46 PM2019-10-26T12:46:37+5:302019-10-26T12:46:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाय-वासरुचे पूजन करुन शहरात वसुबारस साजरी करण्यात आला़ अत्यंत भक्तीभावाने झालेल्या या पूजनानंतर घरोघरी ...

Mukti jivani unloaded, there was a Diwali of house-to-house happiness | मुक्या जीवांची होऊन उतराई, आली घरोघरी आनंदाची दिवाळी

मुक्या जीवांची होऊन उतराई, आली घरोघरी आनंदाची दिवाळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गाय-वासरुचे पूजन करुन शहरात वसुबारस साजरी करण्यात आला़ अत्यंत भक्तीभावाने झालेल्या या पूजनानंतर घरोघरी आनंदाची दिवाळी साजरी करण्यास सुरुवात झाली आह़े तत्पूर्वी दुपारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती़ 
शहरातील सुभाष चौक, मंगळ बाजार, हुतात्मा चौक, सोनार गल्ली यासह विविध ठिकाणी खरेदीसाठी दिवसभर नागरिकांची गर्दी होती़ वसुबारस आणि लक्ष्मीपूजनासाठी लागणा:या पूजा साहित्यासह सोने चांदी खरेदीलाही पसंती दिली जात होती़ यातून दिवसभरात कोटी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली़ पणत्या, पूजनासाठी लागणारी केरसुणी, बत्तासे, ङोंडू आणि इतर फळांची दिवसभर मोठी विक्री झाली़ 
शहरात यंदाही तयार फराळाची खरेदी मोठय़ा प्रमाणात झाल्याचे दिसून आल़े महिलांकडून घरी पदार्थ तयार करण्यापेक्षा मिठाई विक्रेत्यांना प्राधान्य देत खरेदी केल्याने विक्रेत्यांकडेही गर्दी झाली होती़  निवडणूकीचे कामकाज संपून वेळ मिळाल्याने शासकीय कर्मचारी, शिक्षक यांनी बाजारात हजेरी लावत उलाढालीत हातभार लावला़ नंदुरबार शहरातील सराफ बाजारात सोने व चांदीचे दागिने तसेच विविध वस्तू खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी हजेरी लावली़ धनत्रयोदशी निमित्त सोने खरेदीची परंपरा असल्याने अनेकांनी सोने चांदीचे दागिने खरेदी केल़े यातून सोने बाजारात 1 कोटीच्या पुढे उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े सोने दर हे गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याने खरेदीत वाढ झाली़ 

Web Title: Mukti jivani unloaded, there was a Diwali of house-to-house happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.