चेतक फेस्टिवलमध्ये नृत्य स्पर्धेत मुंबईच्या ग्रुपची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:46 PM2017-12-18T15:46:58+5:302017-12-18T15:50:27+5:30
सारंगखेडा, ता़ शहादा येथे चेतक फेस्टिवलअंतर्गत रोज विविध स्पर्धा घेण्यात येत आहे़ सारंग नृत्य स्पर्धेत वी. आर. ब्रदर्स (मुंबई) या ग्रुपने प्रथम, ट्रिझियन्स ग्रुप (पुणे) द्वितीय तर नटराज दर्शन ग्रुप (नालासोपारा)ने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.
आॅनलाईन लोकमत
सारंगखेडा,दि.१८ : सारंगखेडा, ता़ शहादा येथे चेतक फेस्टिवलअंतर्गत रोज विविध स्पर्धा घेण्यात येत आहे़ सारंग नृत्य स्पर्धेत वी. आर. ब्रदर्स (मुंबई) या ग्रुपने प्रथम, ट्रिझियन्स ग्रुप (पुणे) द्वितीय तर नटराज दर्शन ग्रुप (नालासोपारा)ने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.
मुंबईच्या वी. आर. ब्रदर्सला एक लाख रुपये, व्दितीय ‘ट्रिझियन्स’ ग्रुपला ५१ हजार रुपये, तसेच नटराज दर्शन ग्रुपला ३१ हजाराचे बक्षीस देण्यात आले. तीनही संघांना रोख बक्षिसासोबत स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.
परीक्षक म्हणून चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, मराठी सिनेअभिनेते नयन जाधव व संतोष भांगरे यांनी काम पाहिले़ सूत्रसंचालन दिनेश कोयडे यांनी केले़
समूह नृत्य स्पर्धेत मूळ सारंगखेडा येथील व सध्या जळगाव येथे रहिवासी असलेली सात वर्षीय चार्वी रंधे हिने ‘मला जाऊ द्या ना घरी’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करीत रसिकांची मने जिंकली.
मिस सारंगी व मिसेस सारंगी स्पर्धा चुरशीची
चेतक फेस्टिवलअंतर्गत घेण्यात आलेली मिस सारंगी व मिसेस सारंगी स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली़ मिसेस सारंगी २०१७ चा किताब नंदुरबार येथील शीतल चौधरी हिने पटकावला़ त्यांनी तिन्ही फेºयांमध्ये उत्कृष्ट काम केले़ ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते़ मिसेस सारंगीचे व्दितीय पारितोषिक पूनम भावसार यांना मिळाला़ तृतीय स्थानी हर्षदा भावसार या राहिल्या़
मिस सारंगीचा किताब दोंडाईचा येथील मानसी पाठक यांना मिळाला़ ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते़ मिस सारंगी स्पर्धेत भारती नायक व शिवानी परदेशी यांचा अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक आला़ त्याचप्रमाणे बेस्ट स्माईल अनुराधा मोरे, बेस्ट वॉक रिता पाटील, बेस्ट फोटो ग्राफिक सुजाता भावसार, बेस्ट फेस मयुरा पारस, बेस्ट पर्सनालिटी ममता सोनवणे आदींना विविध गटात पारितोषिक देण्यात आले़ परीक्षक म्हणून पूनम बेडसे, श्रध्दा अजमेरा, ऐश्वर्या रावल, तेजल चौधरी, सुनंदा पाटील, मेघा खारकर, सुजाता बोरसे यांनी काम पाहिले़