ािस्ती समाजातर्फे मूक मोर्चा
By admin | Published: March 30, 2017 05:25 PM2017-03-30T17:25:46+5:302017-03-30T17:25:46+5:30
ािस्ती समाज मंडळांवर होणारे अत्याचार तसेच विविध मागण्यांसाठी समाजातर्फे गुरुवारी नंदुरबारात मूक मोर्चा काढण्यात आला.
Next
अन्याय, अत्याचाराचा निषेध : उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधव सहभागी
नंदुरबार,दि.30- ािस्ती समाज मंडळांवर होणारे अत्याचार तसेच विविध मागण्यांसाठी समाजातर्फे गुरुवारी नंदुरबारात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात उत्तर महाराष्ट्रासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील ािस्ती समाजमंडळ, संस्था, व्यक्ती यांच्यावर हल्ले होत आहेत. यामुळे समाज भयभित झाला आहे. यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबारात गुरुवार, 30 मार्च रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या 15 दिवसांपासून या मोर्चासंदर्भात समाजातर्फे जनजागृती सुरू होती. सकाळी वळण रस्त्यावरील सी.बी.पेट्रोलपंपापासून मूक मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा शिस्तीने मुख्य मार्गाने येवून साक्रीनाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अनेक वक्क्तांनी मार्गदर्शन करून समस्या आणि प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रय} केला. नंदुरबार, नाशिक व जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी ािस्ती संस्था, मंडळे, ािस्ती समाजातील पालक, सुवार्तिक, रेव्हरंड, पास्टर यांच्यावर अनेक ठिकाणी काही धर्माध आणि जातीयवादी संघटना अन्याय अत्याचार करत आहेत़ अनेक ठिकाणी विविध उपक्रमात अडचणी आणल्या जात आहेत़ स्मशानभूमीत जागा न देणे, चर्च बांधायला ना-हरकत प्रमाण न देऊ देणे, जाहिर सभा न घेऊ देणे यासह ािस्ती समाजाच्या विविध उपक्रमांना विरोध दर्शवला जात आह़े काही गावांमध्ये ािस्ती पद्धतीने होणारा साखरपुडा आणि विवाह लावण्यास विरोध करण्यात येत आह़े त्याबाबत शासनाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वक्तांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.
यावेळी दिलीप नाईक, प्रेमदास कालू, जोसेफ मलबारी, देवेंद्र शिंदे, पाष्टर विन्सेट राज, जयंतीभाई फिडदेलिया, विनायक गावीत, नरपतभाई, अभय त्रिभुवन, मोहन पावरा, ए.आर.नाथाणी, आर.के.वळवी, रमेश वळवी, करणसिंग वळवी आदी उपस्थित होते.