खांडेपाडा येथील मारहाणीत एकाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:07 PM2018-04-07T13:07:45+5:302018-04-07T13:07:45+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 7 : उसनावारीच्या पैशांच्या वादातून खांडेपाडा, ता.नंदुरबार येथे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.
खांडेपाडा, ता.नंदुरबार येथील नुरजी इस:या गावीत व कमलेश गोबजी गावीत यांच्यात उसनावरीच्या पैशांचा वाद होता. नुरजी गावीत हे 15 जून 2017 रोजी कुटण्या नाल्याच्या बंधा:याजवळ नातेवाईकासह जेवन करीत असतांना त्यांना कमलेश गोबजी गावीत याने मागून येवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात इस:या गावीत यांचा मृत्यू झाला.
वासु नुरजी गावीत याने तालुका पोलिसात फिर्याद दिली असता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरिक्षक जी.एस.बोडके यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला चालला.
न्या.राजेश गुप्ता यांनी साक्षी, पुरावे ग्राह्य धरले तसेच दोन साक्षीदार महत्वाचे ठरले. कमलेश गोबजी गावीत यास पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तुषार कापडीया यांनी काम पाहिले.