तापी नदीवरील हातोडा पुलाचे ‘आप’ अनुयायांकडून करण्यात आले नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:15 AM2017-08-22T11:15:13+5:302017-08-22T11:41:07+5:30
संत गुलाम महाराज सेतू : जिल्हाभरातून पायी दिंडीने आले होते शेकडो कार्यकर्ते वावद ते मोरवड समाधीदर्शन..
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तापी नदीवरील हातोडा पुलास आदिवासी ‘संत गुलाम महाराज सेतू’ असे नामकरण सोमवारी करण्यात आले. या वेळी महाराजांचे शेकडो अनुयायी उपस्थित होते.
संत गुलाम महाराज आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून, त्यांनी आप मुळधर्माच्या माध्यमातून गुजरात-मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यातील माणसे मनाने जोडली आहेत. त्यामुळे हातोडा पुलास त्यांचे नामकरण केले. यासाठी मोरवड, शिंदे, पळाशी, कोळदा, होळ, धामडोद, होळतर्फे हवेली आदी गावांनी त्याबाबच्य ग्रामसभेत ठरावदेखील केला आहे. त्याबाबत आपल्यास्तरावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तथापि महाराजांच्या अनुयायांनीच सोमवारी दुपारी पुलाचे नामकरण ‘संत गुलाम महाराज सेतू’ केले. या वेळी महाराजांचे शेकडो अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, मोरवडचे सरपंच प्रविण वळवी, डॉ.कांतीलाल टाटीया, आदिवासी संग्राम दलाचे हिरामण पाडवी, किसन महाराज, रुपसिंग पाडवी, गुजरातमधील भाजपाचे महेंद्र पाटील, नारायण ठाकरे, विनोद मोरे, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.