नंदुरबार : कार नावावर करण्याच्या बहाण्याने एकाची पाच लाखात फसवणूक
By मनोज शेलार | Updated: March 23, 2024 18:31 IST2024-03-23T18:30:18+5:302024-03-23T18:31:25+5:30
याप्रकरणी सुरत येथील एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : कार नावावर करण्याच्या बहाण्याने एकाची पाच लाखात फसवणूक
नंदुरबार : कार नावावर करण्याच्या बहाण्याने नंदुरबारातील एकाची पाच लाख १० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सूरत येथील एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील संजय विष्णू रगडे यांनी सूरत येथील दीपकभाई परवीनभाई रैयानी यांच्याकडून कार (क्रमांक जीजे ०६ पीएच ६२०२) खरेदी केली. संबंधित कार ही आपल्या मालकीची असल्याचे सांगून त्यांनी संजय रगडे यांना पाच लाख १० हजार रुपयांमध्ये विक्री केली. परंतु ती कार रैयाने यांच्या मालकीची नसल्याचे स्पष्ट झाले. कागदपत्रेही दिली जात नव्हती.
परिणामी संजय रगडे यांच्या नावावर कार होत नव्हती. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर रगडे यांनी दीपकभाई परवीनभाई रैयानी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहे.