नंदुरबार व शहादा तालुक्यात तुरळक पावसाची हजेरीने तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:09 PM2019-12-02T12:09:38+5:302019-12-02T12:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या़ यातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा/नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या़ यातून काही ठिकाणी कापूस गळून पडल्याचे दिसून आले आह़े शहादा तालुक्यात प्रकाशा तर नंदुरबार तालुक्यातील तापी काठालगतच्या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती़
रविवारी पहाटे 1 वाजेपासून पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आह़े प्रकाशा ता़ शहादा मंडळात सात मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आह़े तर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे, बोराळे, समशेपूर, कोरीट या तापी काठालगतच्या गावांमध्ये तसेच दक्षिणेकडील आष्टे मंडळातील गावांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती देण्यात आली आह़े या पावसामुळे खळवाडय़ांमध्ये तसेच घरांच्याबाहेर ऊन लावण्यासाठी ठेवलेल्या कापासाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े
प्रकाशा परिसरात ब:याच ठिकाणी अद्यापही कापूस वेचणी शिल्लक आह़े यातून पहाटे पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी बोंडे तसेच कापूस गळू पडल्याची माहिती देण्यात आली आह़े रविवार असल्याने प्रशासनाने अद्याप या नुकसानीची दखल घेतलेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होत़े यातून दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही़ हे वातावरण कायम राहिल्यास मिरची आणि हरभरा या पिकांना नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े
नंदुरबार तालुक्यातील आष्टे परिसरात कांदा उत्पादकांना या पावसाचा फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े रविवारी सायंकाळनंतर पुन्हा ढग दाटून आलेले असल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले होत़े यातून शेतक:यांनी आवराआवर करत पिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला होता़