सुरक्षा रक्षकांअभावी नंदुरबारातील एटीएम असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:00 PM2018-06-11T12:00:24+5:302018-06-11T12:00:24+5:30
दुर्लक्ष : अनेक ठिकाणी एकाच कर्मचा:याला करावी लागते ‘डबल शिफ्ट’
नंदुरबार : नंदुरबार शहरातील एटीएम सुरक्षा रक्षकांअभावी असुरक्षित असल्याचे रविवारी ‘लोकमत’तर्फे करण्यात आलेल्या सव्रेक्षणात दिसून आल़े एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम वगळता इतर बँकांच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े
रविवारी ‘लोकमत’तर्फे नंदुरबार शहरातील विविध बँकांचे एटीएमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला़ त्यात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील तसेच शास्त्री मार्केट मधील एटीएम, अंधारे चौकाजवळील पंजाब नॅशनल बँक, धुळे रस्त्यावरील महाराष्ट्र बँक, अमृत चौकातील बँक ऑफ इंडिया व कॅनरा बँक, गणपती मंदिराजवळील युनियन बँक आदी बँकांच्या एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून आल़े शहरात केवळ एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय बँक या दोनच बँकांच्या एटीएमजवळ सुरक्षा रक्षक असल्याचे आढळल़े त्यामुळे संबंधित बँकांना आपल्या एटीएमची सुरक्षितता गरजेची वाटत नाही काय? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आह़े एकीकडे चो:यांच्या घटना वाढत असताना दुसरीकडून बँकांकडून एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अनेक एटीएमजवळ कमालीची अस्वच्छता दिसून आली़ अनेक वेळा एटीएममधून पैसे काढताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात़ त्यामुळे साहजिकच सुरक्षा रक्षकावर ती अडचण सोडविण्याची जबाबदारी असत़े परंतु सुरक्षा रक्षकच हजर नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असत़े