पितृपक्षामुळे नंदुरबारातील बसफे:यांवर कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:19 PM2018-09-27T12:19:11+5:302018-09-27T12:19:15+5:30
मुंबई कार्यालयातून आदेश : लांब पल्यांच्या बसफे:यांवर जाणवेल परिणाम
नंदुरबार : 25 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पितृपक्षामुळे जिल्ह्यातील ‘काही’ बसफे:यांवर कात्री लागण्याची शक्यता आह़े याचा परिणाम लांब पल्यांच्या बसफे:यांवर परिणाम जाणवू शकतो़
गणेशोत्सवानंतर लगोलग पितृपक्षाची सुरुवात झालेली आह़े साधारणत 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या कालखंडात कुठलेही शुभ कार्य करण्यास टाळण्यात येत असल्याचे जुण्या जाणत्यांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे साधारणत लगA कार्ये, सत्यनारायण आदी कुठलेही शुभ काम या दिवसांमध्ये करण्यात येत नसत़े त्यामुळे साजिकच या काळात प्रवासदेखील कमी होत असतो़ प्रवाशांचे कमी भारमान असल्याने अनेक लांब पल्यांच्या बसेस तोटय़ात जात असतात़ त्यामुळे एसटी महामंडळाकडून पितृपक्षात आपल्या बसफे:यांमध्ये आवश्यकतेनुसार कपात करावी असे संबंधित आगारप्रमुखांना दिले असल्याची माहिती देण्यात आलेली आह़े त्यानुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील विविध आगाराकडून लोकलसह लांब पल्ल्यांच्या बसफे:या कमी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आह़े
पितृपक्षाचा साधारणत 15 दिवसांचा कालावधी असतो़ पितृपक्षात आपल्या पूर्वजांना तसेच निधन पावलेल्या आप्तेष्टांना स्मरण करुन घरात गोडधोड करुन आगारीव्दारे त्यांना जेवनास आमंत्रीत करण्यात येत असत़े त्यामुळे पितृपक्षाबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक भितीचे वातावरण निर्माण होत असत़े
ग्रामीण भागात पितृपक्षाचे अनन्यसाधारण महत्व आह़े पितृपक्षात कुठलेही शुभ काम करण्याचे टाळण्यात येत असत़े याबाबत ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात सतर्क असतात़ त्यामुळे इतरत्र प्रवास करणे टाळण्यात येत असत़े
जिल्ह्याचा विचार करता ग्रामीण भागातून शहरी भागात कामानिमित्त किंवा रोजगारासाठी येणा:यांची संख्या मोठी आह़े त्यामुळे साहजिकच याचा परिणाम जिल्ह्यांतर्गत होत असलेल्या बसफे:यांवर कमी प्रमाणात जाणवत असतो़ त्यामुळे जिल्ह्यातील बसफे:यांना पितृपक्षाचा फारसा परिणाम जाणवत नाही़ परंतु लांबच्या बसफे:यांवर मात्र याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता असत़े आधिच कमी भारमान असल्याने अक्कलकुवा, नवापूर आगारातील बहुतेक बसफे:या तोटय़ात सुरु आहेत़ जिल्ह्यात अक्कलकुवा आगार तोटय़ाच्या गर्तेतच गेले आहेत़ त्यातच पितृपक्षामध्ये तोटय़ातच बसफे:या कराव्या लागत असतात़
त्यामुळे मुंबई कार्यालयाकडून विविध आगारांना पत्रे पाठवून आवश्यकतेनुसार बसफे:या बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आह़े त्यानुसार नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा आगराकडून कुठल्या बसफे:यांचे कमी भारमान आहेत याची माहिती घेत त्या बसफे:या पितृपक्षात बंद ठेवण्याच्या हालचालींना वेग आला आह़े