नंदुरबारात भाजप 2 तर शिवसेना-काँग्रेस प्रत्येकी एक ठिकाणी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:49 AM2019-10-24T10:49:19+5:302019-10-24T10:49:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतांची चढाओढ सुरु आह़े नंदुरबारचे भाजपचे विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतांची चढाओढ सुरु आह़े नंदुरबारचे भाजपचे विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत हे विजयाकडे आगकूच करत आहेत़ ते तब्बल 47 हजार मतांची आघाडी घेत सहाव्यांदा विजयाकडे वाटचाल करत आहेत़
शहाद्यात काँग्रेसचे माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी व भाजपचे उमेदवार राजेश पाडवी अत्यंत तगडा सामना रंगला आह़े याठिकाणी राजेश पाडवी हे पाच हजार मतांनी पुढ होत़े ते आता 1 हजाराच्या आत आल्याचे वृत्त आले आह़े त्यांचा लीड कमी होऊन अॅड़ पद्माकर वळवी यांच्या मतांमध्ये वाढ बघण्यास मिळत आह़े दोघांसोबतच अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा हे पुढे आहेत़
नवापुर मतदारसंघात अपक्ष शरद गावीत व काँग्रेसचे शिरीष नाईक यांच्या सरळ सामना सुरु होता़ परंतू काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक यांच्या मताधिक्क्य प्रत्येक फेरीअंती वाढत आह़े तूर्तास नाईक हे 4 हजार 954 मतांनी आघाडीवर आहेत़ त्यांना आतार्पयत फे:यांमधून 44 हजार मते मिळाली आहेत़ अपक्ष शरद गावीत यांना 42 हजार 114 तर भाजपाचे भरत गावीत यांना 23 हजार 653 मते मिळाली आहेत़
अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचे आमशा पाडवी व काँग्रेसचे विद्यमान आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी यांच्यातील चढाओढ लक्षवेधी ठरत आह़े आतार्पयत हाती आलेल्या आकडेवारी नुसार अॅड़ क़ेसी पाडवी यांना 21 हजार 790 तर शिवसेनेचे आमशा पाडवी यांना 21 हजार 643 मते मिळाली आहेत़ भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी हे 5 हजार 144 मते मिळवून तिस:या स्थानावर आहेत़ क़ेसी़पाडवी यांना केवळ 327 मतांचा लीड मिळाला होता़ परंतू आठव्या फेरीअखेर शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांना 228 मतांची आघाडी मिळाली आह़े आमशा पाडवी यांना 24 हजार 816 तर क़ेसी़पाडवी यांना 24 हजार 588 मते मिळाली आहेत़ दरम्यान शहादा येथे पाऊस सुरु झाल्याने मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी आलेल्या समर्थकांची चांगलीच धावपळ उडाली होती़ शहराबाहेर असलेल्या तहसील कार्यालया परिसरात निवारा नसल्याने अनेकांचे हाल झाल़े