नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: February 6, 2018 01:24 PM2018-02-06T13:24:38+5:302018-02-06T13:24:54+5:30

Nandurbar bolladams needs 90 crores | नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज

नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज

googlenewsNext

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात बोंडअळीने नुकसान झालेल्या 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख 22 हजार 145 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े यात जिरायत व बागायत या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त असलेले एकूण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र आह़े
तालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आह़े व आवश्यक असलेल्या मदतीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आह़े बोंडअळीग्रस्त जिरायतदार असलेल्या 52 हजार 492 शेतक:यांच्या 55 हजार 754 हेक्टरासाठी  38 कोटी 63 लाख 72 हजार 940 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े
तर, बागायतदार असलेल्या 33 हजार 403 शेतक:यांच्या 40 हजार 47 हेक्टरसाठी 51 कोटी 1 लाख 49 हजार 205 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े जिरायतदार व बागायतदार असलेल्या 85 हजार 895 शेतक:यांचे  95 हजार 802 हेक्टर क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े त्यासाठी 89 कोटी 65 लाख 22 हजार 115 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े 
गेल्या अनेक दिवसांपासून तालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यात येत होती़ परंतु काही ठिकाणी पंचनामे करण्यास अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत होत़े त्यामुळे पंचनामे करण्यासही कृषी विभागाला विलंब झाला होता़ 
अनेक शेतक:यांना डावलले.
बोंडअळीच्या थैमानामुळे येथील शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आह़े त्यामुळे बहुतेक शेतक:यांनी आपले क्षेत्रावरील कपाशीच्या पिकावर नांगर फिरवला होता़ बोंडअळीने कपाशी खाऊन टाकल्याने शेतक:यांनी दुसरे पिक घेण्यासाठी शेत रिकामे केले होत़े परंतु यात त्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानदेखील झाले होत़े कपाशी पेरणीसाठी बि-बियाणे आदींवर मोठा खर्च करण्यात आला होता़ दुसरीकडे कृषी विभागाकडून मात्र, ज्या क्षेत्रावर सध्याच कपाशी आहे अशांचेच पंचनामे करण्यात आले होत़े त्यामुळे ज्या शेतक:यांनी कपाशी काढून टाकली आहे व दुसरे पिक घेतले आहे त्यांच्या आधीच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आह़े त्यामुळे अनेक शेतक:यांनी कृषी विभागाच्या या पंचनाम्यावर आपली नाराजी व्यक्त केली आह़े दरम्यान असे असले तरी, ज्या शेतक:यांच्या पांढ:या सोन्याला खरोखर बोंडअळीने खाल्ले आहे अशा ख:या लाभाथ्र्याची मात्र यात हेडसांड होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा बोंडअळीने थैमान घातले होत़े़ यात, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरीदेखील पुरता भरडला गेला आह़े परंतु प्रशासनाच्या चालढकलपणामुळे त्याला पहिले आसमानी व नंतर  सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आह़े 
जिल्ह्यात कापूस पेरणी केलेल्या शेतक:यांची संख्या एकूण 91 हजार 998 ऐवढी आह़े त्यापैकी तब्बल 85 हजार 895 शेतक:यांची बोंडअळीमुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आह़े 
त्यात, जिरायतदार शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आह़े जवळपास 55 हजार 754 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आह़े त्यामुळे जिरायतदार शेतकरी यात चांगला आर्थिक पेचप्रसंगात सापडला आह़े शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े 
 

Web Title: Nandurbar bolladams needs 90 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.