नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:36 AM2019-02-13T11:36:56+5:302019-02-13T11:37:05+5:30

शहाद्यात काँग्रेसचा मेळावा : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती

Nandurbar is determined to win the Lok Sabha seat | नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार

नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार

Next

शहादा : आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी शहादा येथे मंगळवारी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केला. मेळाव्यास नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शनही घडले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा मेळावा शहादा येथील खरेदी-विक्री संघाच्या आवारात मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी माजी खासदार माणिकराव गावित होते. या वेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी खासदार बापू चौरे, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार काशीराम पावरा, आमदार डी.एस. अहिरेल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव सोनवणे, जिल्हा प्रभारी योगेश पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर, शिरीष नाईक, भरत गावीत, रामचंद्र पाटील, रमेश गावीत, दत्तू चोरे, आत्माराम बागले, रतन पाडवी, कुणाल वसावे, संजय माळी, सी.के. पाडवी, विक्रम पाडवी, रोहिदास पाडवी, प्रा.संजय जाधव, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, गौतम जैन, जि.प. सदस्या संगीता पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, सुनील सखाराम पाटील , प्रेमसिंग आहेर, रवींद्र रावल, नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, सभापती रंजना नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शमीमबी कुरेशी, कंचनबाई पाटील, शांताबाई पवार, दीपक पटेल, विक्रम पाडवी आदी उपस्थित होते.
यावेळी राज्य सरचिटणीस सोनवणे म्हणाले की, राज्य व देशात आज वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. जनता हवालदिल झाली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. यातून सावरायचे असेल तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. देशाला विकासाची दिशा देण्यासाठी आणि या नौटंकी सरकारला घालविण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
अ‍ॅड.पद्माकर वळवी म्हणाले की, नदुंरबार जिल्हा क्राँग्रेसमय आहे. शेतकरी-कष्टकºयांना उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे कायदे देश व जनतेच्या हिताचे होते ते मोडकळीस आणण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करीत आहे. जनधन योजनेतही भाजप सरकारने गोरगरीबांची लूट चालवली आहे. नुकतीच जातपडताळणी समित्या रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याचे सांगून या निर्णयाचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील म्हणाले की, शेतकरी व सहकारविरोधी असणाºया या सरकारने सहकार मोडकळीस आणण्याचे काम केले आहे. शेतकºयांचे सातबारे आजही कोरे नाहीत. काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवतो त्यामुळे आपले घर आपणच सांभाळताना युवकांना जवळ केले पहिजे. ज्यांना आपले महत्व नाही त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी म्हणाले की, उपसा सिंचन योजना पूर्ण होणे आवश्यक होते. रहाट्यावड धारणालाही अडचणी आणल्या जात असून विकासाच्या नावावर दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम सनेर म्हणाले की, शेतकरी-कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र घोडेबाजारासाठी निधी आहे. पर्यटनाच्या नावाने त्याच निधीवर डल्ला मारुन जनतेला लुटण्याचे काम हे सरकार करीत असून पीक विमा कर्ज, गॅस अनुदान आदी योजनांच्या नावाने जनतेचा खिसा खाली करणाºया या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले. माणिकराव गावीत म्हणाले की, शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेची केंद्र व राज्य सरकारकडून थट्टा सुरू आहे. आश्वासनांची खैरात वाटणाºया या सरकारला घरी बसविण्याची वेळ आल्याचे सांगितले. आमदार डी.एस. अहिरे, बापू चौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर मोरे यांनी केले.

Web Title: Nandurbar is determined to win the Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.