पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्यात 6 हजार दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: December 3, 2017 01:07 PM2017-12-03T13:07:24+5:302017-12-03T13:07:38+5:30
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे गेल्या पाच वर्षात 6 हजार 112 लाभाथ्र्याना अपंग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आह़े केंद्र शासनाने सुरु केलेल्या नवीन उपक्रमानुसार ‘युडीआयडी’ (युनिक डिसअॅबीलीटी कार्ड फॉर डिसअॅबल पर्सन) कार्डाचे 40 जणांना वाटप करण्यात आल़े या कार्डासाठी जिल्हाभरातून एकूण 66 प्रस्ताव आले होत़े
जागतिक अपंग दिनानिमित्त लोकमततर्फे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची स्थिती, मिळणारे लाभ, लाभार्थी संख्या आदींबाबत माहिती घेण्यात आली़ शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम तसेच योजना आखण्यात आल्या आह़े परंतु याबाबत जनजागृतीत प्रशासन कमी पडत असल्याचे जाणवत आह़े 2012 ते 2017 या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे लाभाथ्र्याकडून एकूण 7 हजार 811 प्रस्ताव सादर झाले होत़े त्यापैकी, 6 हजार 112 लाभार्थी पात्र ठरले होत़े तर 1 हजार 644 लाभार्थी तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरविण्यात आले होत़े उर्वरीत 53 लाभाथ्र्याचे प्रमाणपत्र हे कागदपत्रांअभावी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आल़े प्रमाणपत्र मिळालेल्या लाभाथ्र्यामध्ये दृष्टीदोष 692, कर्णदोष 472, मानसिक आजार 21, मतिमंद 446 तर अस्थिव्यंगाच्या 4 हजार 481 जणांना अपंग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आह़े
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी अपंग प्रमाणपत्राबाबत ओपीडी घेण्यात येत असत़े त्यात लाभाथ्र्याची तपासणी करण्यात येऊन आवश्यक ती कागदपत्रे यांचीही पाहणी करण्यात येत असत़े तपासणीत संबंधित लाभाथ्र्यांचे अपंगत्वाचे प्रमाण हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागपदत्रांची तपासणी करुन ते कागदपत्रे व लाभाथ्र्याची संबंधित डॉक्टरने केलेल्या तपासणीअंती देण्यात आलेला तपासणी फार्म हे शासकीय संकेतस्थळावर फीडींग करण्यात येतात़ त्यानंतर आवश्यक त्या कार्यवाहीची पूर्तता करुन अपंग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत असत़े
विभागवार कामाचे स्वरुप गरजेचे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र वाटपासाठी वेगळा विभाग नसल्याचे सांगण्यात आल़े लाभाथ्र्याची यामुळे अनेक वेळा फिराफिरदेखील होत असत़े त्यामुळे अपंगांच्या योजना विभागावार राबविल्यास हे अधिक सोयीचे होणार आह़े
शिबिर घेण्याची आवश्यकता.
अपंग प्रमाणपत्र वाटपासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शिबिर घेण्यात येत नाही़ त्यामुळे शासकीय लाभापासून खरे लाभार्थी वंचितच राहत असल्याचेही अनेक वेळा दिसून येत असत़े नंदुरबार सारख्या दुर्गम भागात शासणाच्या विविध योजनांची माहिती पोहचणे आवश्यक असत़े
परंतु जनजागृती अभावी योजनांचा प्रचार प्रसार होत नाही़ त्यामुळे अनेक लाभार्थी हे लाभापासून कोसो दूरच असतात़ दरम्यान, शिबिरासाठी गेल्या काही वर्षापासून शासनाकडूनच ब्रेक लावण्यात आला आह़े शिबिर घेऊनही रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच यावे लागत असत़े
शिबिर ठिकाणी सर्वच यंत्र सामग्री आणणे व्यवहार्य नसल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ़ नरेंद्र खेडकर यांनी सांगितल़े