नंदुरबार जि.प.निवडणुकीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:59 PM2018-07-28T12:59:19+5:302018-07-28T12:59:25+5:30

56 गट आणि 112 गण : 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गण रचना

Nandurbar District Elections | नंदुरबार जि.प.निवडणुकीच्या हालचाली सुरू

नंदुरबार जि.प.निवडणुकीच्या हालचाली सुरू

googlenewsNext
<p>नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गण प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हा परिषदेत आता 56 गट आणि 112 गण राहणार आहेत. 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत ही रचना राहणार आहे. 10 ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होऊन 19 सप्टेंबर रोज अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींची मुदत 29 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत गट व गणांच्या प्रभाग रचनेची अधिसुचना शुक्रवार, 27 जुलै रोजी जारी करण्यात आली. 
प्रभाग रचनेचे विविध टप्पे राहणार आहे. त्यात जिल्हाधिका:यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करणे व विभागीय आयुक्त यांना सादर करणे, विभागीय आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, जिल्हाधिका:यांनी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
सोडतीनंतर प्रारूप प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करणे, जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी देणे, त्यानंतर जिल्हाधिका:यांनी अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना राजपत्रतात प्रसिद्धीस दिली जाणार आहे.
गट व गणांची आरक्षण सोडत
गट व गणांची आरक्षण सोडत त्यानंतरच्या टप्प्यात काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ही जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत   समितींची आरक्षण सोडत ही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका मुख्यालयी काढण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा कार्यक्रम जाहीर होणार आहे.अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गाकरीता एक जागा आरक्षीत होत आहे. मागील निवडणुकीमध्ये सदर जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षीत होती त्यामुळे आता सदर जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षीत होईल.
यावेळीही शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक 14 गट तर 28 गण राहणार आहेत. तर सर्वात कमी गट तळोदा तालुक्यात पाच व 10 गण राहणार आहेत.

Web Title: Nandurbar District Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.