नंदुरबार जिल्ह्यात 44 उमेदवारांचे 71 अजर्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:09 PM2019-10-05T12:09:19+5:302019-10-05T12:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एकच गर्दी झाली होती. काही उमेदवारांनी मोजक्याच पदाधिका:यांसह तर काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली. दुपारी तीन वाजेर्पयत सर्वच ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गजबज कायम होती. दरम्यान, शनिवार, 5 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
अक्कलकुवा
अॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), आमशा पाडवी (शिवसेना), रोता पाण्या तडवी (वंचीत आघाडी), नागेश पाडवी (अपक्ष), कैलास वसावे (आम आदमी पार्टी), संजय वळवी (भारतीय ट्रायबल पार्टी), शंकर आमशा पाडवी (शिवसेना), रवींद्र वसावे (भारतीय ट्रायबल पार्टी), किरसिंग वसावे (अपक्ष), भरत पावरा (अपक्ष), बिजेसिंग पावरा (अपक्ष), हेमलता पाडवी (अपक्ष), जयसिंग वळवी (अपक्ष).
शहादा
पद्माकर वळवी (काँग्रेस), राजेश पाडवी (भाजप), सिमा पद्माकर वळवी (काँग्रेस, अपक्ष), जयसिंग माळी (माकप), जेलसिंग पावरा (अपक्ष), सचिन सुदाम कोळी (अपक्ष) मोहनसिंग शेवाळे (अपक्ष).
नंदुरबार
डॉ.विजयकुमार गावीत (भाजप), उदेसिंग पाडवी (काँग्रेस), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष), विश्वनाथ वळवी (अपक्ष), कुणाल वसावे (अपक्ष), सुप्रिया विजयकुमार गावीत (भाजप), दिपा वळवी (वंचीत आघाडी), विपूल रामसिंग वसावे (बसपा), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी).
नवापूर
शिरिष नाईक (काँग्रेस), भरत गावीत (भाजप), शरद गावीत (अपक्ष), माधवराव पाडवी (अपक्ष), संगिता भरत गावीत (भाजप), उल्हास वसावे (भारतीय ट्रायबल पार्टी), प्रकाश गांगुर्डे (अपक्ष), अर्चना गावीत (अपक्ष), डॉ.सुनील गावीत (आम आदमी पार्टी), रजनी नाईक (काँग्रेस), जगन गावीत (वंचीत आघाडी), रामा गावीत (वंचीत आघाडी), अजरूनसिंग वसावे (अपक्ष), रामू वळवी (पिपल्स पार्टी).