नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसात 156 मिलीमीटर पाऊस
By admin | Published: July 3, 2017 12:16 PM2017-07-03T12:16:25+5:302017-07-03T12:16:25+5:30
बियाणे आणि खते पडून : जिल्ह्यात शेतीकामांचा वेग मंद; नदी व नाले कोरडेच
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.3 - जिल्ह्यात तुरळक पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़ परिणामी शेतशिवारात शुकशुकाट पसरला असून केवळ 11 टक्के पेरण्या झाल्या आहेत़ गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात 156 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आह़े
जिल्ह्यात यंदा पावसाच्या अनियमित हजेरीमुळे जुलै उजाडूनही केवळ 24 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ कोरडक्षेत्रात अद्यापही 80 टक्के पेरण्या झालेल्या नाहीत़ पाऊस सुरू झाल्यानंतर शेतक:यांनी तत्काळ बियाणे, खत आणि इतर अनेक साहित्याची जोमदारपणे खरेदी केली होती़ पाऊस नसल्याने हे साहित्य पडून आह़े जमिनीत ओलावा नसल्याने शेतक:यांनी पेरण्या केलेल्या नाहीत़ शनिवारपासून काही ठिकाणी पाऊस सुरू झाला होता़ मात्र काही मिनिटातच पाऊस बंद झाल्याने पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आह़े जिल्ह्यातील विविध भागातील नदी नाले कोरडेच आहेत़ याउलट बागायत क्षेत्रात शेतात पाणी उपलब्ध असल्याने कापूस संगोपन करण्यासाठी धावपळ सुरू आह़े याठिकाणी कृषिपंपांचा जोर ओसरला असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आह़े
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 156 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़ेयात रविवारी नंदुरबार 19, नवापूर 6, तळोदा 8, शहादा 2, अक्कलकुवा 6 आणि धडगाव तालुक्यात चार अशा एकूण 45 मिलीमीटर पावसाची नोंद आह़े तत्पूर्वी ठिकठिकाणी 106 मिलीमीटर पाऊस कोसळला होता़
अल्प पावसामुळे जिल्ह्यात पेरण्या पूर्णपणे सुरू झालेल्या नसल्याची माहिती आह़े आतार्पयत तब्बल 24 हजार 952 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ यात नंदुरबार एक हजार 300, नवापूूर 262, शहादा 9 हजार 719, तळोदा एक हजार 130, धडगाव 448 तर अक्कलकुवा तालुक्यात 3 हजार 851 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत़