नंदुरबार जिल्हा पॉझिटिव्ह @ 11
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:28 PM2020-04-26T13:28:03+5:302020-04-26T13:29:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील एक रुग्ण २४ एप्रिलला व याच परिसराजवळ दुसरा रूग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील एक रुग्ण २४ एप्रिलला व याच परिसराजवळ दुसरा रूग्ण २५ एप्रिल ला कोरोना विषाणू संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने शहरातील कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या चार झाली आहे. पैकी एक मयत झाला आहे, दोन दिवसात दोन रुग्ण वाढल्याने शहरातील कंटेनमेंट व बफर झोन ची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे २३ नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली.
२१ एप्रिल ला शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनातर्फे त्यांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचा शोध सुरू असताना २४ एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक चार मधील एका खासगी रुग्णालयातील कंपाउंडर याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पुन्हा २५ एप्रिलला एका खाजगी डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामुळे शहरातील रुग्णांची संख्या चार झाली आहे. सलग दोन दिवसात दोन रुग्णांची वाढ झाल्याने २४ एप्रिल च्या सायंकाळपासून संपूर्ण परिसरात पालिका प्रशासनातर्फे जंतूनाशक फवारणी करण्यात येत होती. पोलीस प्रशासनातर्फेही नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमधील परिसरात बॅरीकेटिंग केली गेली आहे.
कोरोना विषाणूग्रस्त डॉक्टर व कंपाउंडर यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीच पालिका प्रशासनाने तीन खासगी रुग्णालयात सील केली होती. तर काल रात्री एका पॅथॉलॉजी लॅब ची तपासणी करण्यात येऊन तेथील रुग्णांच्या नोंदीची डायरीत जप्त करण्यात आली असून तिची तपासणी केली जात आहे.
प्रभाग क्रमांक सात मधील कोरोना विषाणु ग्रस्त माता व पुत्र या दोघांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित युवक हा १९ एप्रिल जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याने शहरातील तीन खाजगी डॉक्टरांकडून गेल्या पंधरा दिवसात उपचार करून घेतले असल्याची माहिती तपासात निष्पन्न होत आहे.
कोरोना विषाणू संक्रमित नागरिकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य व संपर्कातील नागरिकांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तपासणी साठी पाठविताना प्रशासनाला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागण्याची बाब उघडकीस येत आहे. प्रशासनाने १०८ ला कॉल केल्यानंतर साधारणत: दोन ते तीन तास उशिरा रुग्णवाहिका येत आहे. परिणामी सर्व अधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत बाधीत रुग्णाच्या परिसरातच थांबावे लागत आहे. २४ एप्रिलला अहवाल प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रशासनाने १०८ रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिल्यानंतर तब्बल तीन तास उशिरा रुग्णवाहिका आली. २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता माहिती दिल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत रुग्णवाहिका प्रशासनापर्यंत पोहोचलेली नव्हती. रुग्णवाहिका विलंबाने येत असल्याने संपूर्ण प्रशासन बाधित रुग्णाच्या परिसरात थांबत असल्याने इतर महत्त्वपूर्ण कामे खोळंबत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या विलंबाची चौकशी करण्याची मागणी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
४आतापर्यंत चार बाधित रुग्णांचे ५९ हाय रिस्क कॉन्टॅक्ट प्रशासनामार्फत पडताळणी करण्यात आले आहेत. लो रिस्क कॉन्टॅक्ट तपासून होम क्वॉरंटाईन करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील व्यक्तींचे सर्व प्राप्त अहवाल हे निगेटिव्ह आहेत.
४अॅक्टीव सर्व्हलन्सची प्रक्रिया प्रभाग क्रमांक ७ मध्ये राबवण्यात येत असून बॅरीकेटींग पूर्ण झाल्यावर प्रभाग क्रमांक चार मध्ये ही अॅक्टीव्ह सर्व्हलन्स करण्यात येईल. तरी नागरिकांनी काही लक्षणे असल्यास स्वत:हुन आरोग्य प्रशासनास संपर्क करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट झोन वगळता अन्य रिटेल दुकाने उद्यापासून ८ ते १२ मध्ये सुरू ठेवण्यात येतील .
४याशिवाय दोन्ही प्रभागातील नगरसेवकांना तरुण स्वयंसेवकांमार्फत जीवनावश्यक वस्तू पोहचवणे बाबत नगरपालिका प्रशासन मार्फत नियोजन करण्यात येत आहे.
४रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून तसेच उद्या अक्षय तृतीया सण ही साजरा होत आहे, तरी नागरिकांनी घरीच सण साजरे करावे. कंटेन्मेंट झोन वगळता अन्य परिसरातील नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी विहित वेळेत बाहेर पडतील. तथापि आवश्यक तेव्हाच बाहेर पडावे. दुचाकी/चारचाकी चा वापर टाळावा आणि मास्क,ग्लोवेस चा वापर करावा.
४जसे जसे शहरातील कोरोना विषाणू ग्रस्त बाधितांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त होत आहे तसेतसे प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधीक्षक पुंडलिक सपकाळे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर यांच्यासह कर्मचाºयांचे पथक बाधित रुग्णांचे कुटुंबातील सदस्य व त्यांच्याशी संपर्कात असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जातत आहे.
४त्यांच्या स्वॉब नमुन्याच्या तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवीत आहे. आतापर्यंत २१ ते २५ एप्रिल दरम्यान एकूण ५९ नमुने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून पैकी २४ व २५ एप्रिलला २३ नमुने पाठविण्यात आले आहेत.