प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:16 AM2019-03-14T11:16:12+5:302019-03-14T11:16:49+5:30

आरटीई : जिल्ह्याभरातून ४७० जागांसाठी केवळ १८३ आॅनलाईन प्रवेश अर्ज

Nandurbar District 'Second Last' in admission process | प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत (आरटीई) पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातून १८३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात ३५३ आरटीई जागांसाठी केवळ १०६ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यात नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’ आहे़ विशेष म्हणजे पालघर, गडचिरोली, यवतमाळ सारखे आदिवासी बहुल जिल्हे नंदुरबारपेक्षा आघाडीवर आहेत़
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत पालकांकडून उत्साह दाखवला जात असला तरी आरटीईअंतर्गत शंभर टक्के प्रवेश होईल अशी खात्री नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ राज्यात सिंधुदूर्ग व नंदुरबार जिल्हे आरटीई प्रथम प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे अहवालातून उघड झालेले आहे़
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७८४ जागांसाठी ३२४ अर्ज, पालघर ४ हजार २५२ जागांसाठी ५७१ अर्ज, यवतमाळ १ हजार ७४४ जागांसाठी तब्बल २ हजार ६५१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे जिल्हे काही प्रमाणात मागे आहेत़
पुणे जिल्हा हा आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रि येत आघाडीवर असून पुणे जिल्ह्यात एकूण ९६३ शाळा प्रवेशास पात्र आहेत़ तर १६ हजार ६१९ विद्यार्थी कोट्यासाठी तब्बल ३० हजार ३६४ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़
उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत प्रवेश प्रकिया राबवली जात आहे़ ५ हजार ७६४ जागांसाठी ७ हजार १४३ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ जळगावात २७४ शाळामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे़ यात, ३ हजार ७१७ जागांसाठी ३ हजार ४१८ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत़ तर धुळ्यात ९७ शाळांतर्फे सुुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेत १ हजार २३७ जागांसाठी ९८० प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात नंदुरबार जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़
दरम्यान, नंदुरबारचा विचार करता यंदा आरटीईच्या पूर्वीच्या ४७९ विद्यार्थ्यांच्या कोट्यामध्ये नऊने घट होऊन यंदा ४७० जागाचा कोटा ठेवण्यात आला आहे़ तर पात्र शाळांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ पूर्वी आरटीई प्रवेश पात्र ४३ शाळा होत्या़ त्यांची संख्या आता ४७ इतकी झाली आहे़ गेल्या वर्षी आरटीईअंतर्गत ४७९ पैकी केवळ १३७ जागाच भरल्या गेल्या होत्या़ तर उर्वरीत जागा पाच वेळा प्रवेश प्रक्रिया राबवूनही भरता आल्या नव्हत्या़ तसेच आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील एकूण ४३ शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत़ परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याचा शाळांना पालकांची पसंती असते़
उर्वरीत शाळांमध्ये आरटीईअंतर्गत देण्यात आलेला विद्यार्थी कोटा हा शंभर टक्के रिक्त राहत असल्याची स्थिती आहे़ त्यामुळे शासनाने यंदा जिल्ह्यातील आरटीई कोटा केवळ ९ जागांनी घटवला तर दुसरीकडे शाळा ४३ वरुन ४७ वर आणल्या असल्याने शिक्षण विभागाच्या अजब निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत़

Web Title: Nandurbar District 'Second Last' in admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.