ऑनलाईन सातबारे देण्यात नंदुरबार जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:39 PM2017-11-30T13:39:01+5:302017-11-30T13:40:10+5:30

Nandurbar district tops the list of online seats | ऑनलाईन सातबारे देण्यात नंदुरबार जिल्हा अव्वल

ऑनलाईन सातबारे देण्यात नंदुरबार जिल्हा अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्दे678 गावांचे सातबारे ऑनलाईन नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तालुकास्तर, भूमिअभिलेख, रेकॉर्ड, जमीन दस्तावेज यासह तलाठींकडून मागवलेल्या दस्तावेजांचे संकलन करून ती माहिती, शासनाने नव्याने निर्मिती केलेल्या ऑनलाईन सातबारा या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे काम ऑगस्ट मह

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यशासनाने ऑनलाईन सातबारे देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही विविध भागात सातबारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात मात्र याउलट स्थिती असून 887 पैकी 678 गावांचे सातबारे ऑनलाईन पाहून प्रिंट करणे नागरिकांना शक्य झाले असून नाशिक विभागात कोणत्याही जिल्ह्याने अद्याप 500 गावांचे कामकाज नसल्याने नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला आह़े 
सातबारा उतारे, गावनमुना किंवा इतर तत्सम कारणांसाठी तलाठींकडे थांबून राहवे लागत होत़े आधीच रिक्त असलेल्या पदांमुळे एकापेक्षा अधिक गावांचा सांभाळ करणा:या तलाठींना कामकाजात अडचणी येत होत्या़  यावर पर्याय म्हणून शासनाने ऑनलाईन सातबारे देण्याचा निर्णय झाला होता़ चार महिन्यांपासून महसूल विभागाकडून गावांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकण्याचे काम सुरू होत़े यातून जिल्ह्यातील 678 गावांचे सातबारे ऑनलाईन झाले आहेत़ 
 

Web Title: Nandurbar district tops the list of online seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.